Changes in body before brain tumor saam tv
लाईफस्टाईल

Early symptoms of brain cancer: मेंदूचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात सुरुवातीला होतात ४ मोठे बदल; दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं

Changes in body before brain tumor: मेंदूचा कॅन्सर किंवा ब्रेन ट्यूमर ही एक गंभीर आणि जीवघेणी स्थिती आहे. इतर कॅन्सरप्रमाणेच, ब्रेन ट्यूमरची लक्षणं सुरुवातीला अस्पष्ट असू शकतात आणि त्यांना अनेकदा सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केलं जातं.

Surabhi Jayashree Jagdish

ब्रेन ट्यूमर हा कॅन्सर आणि नॉन कॅन्सर अशा दोन पद्धतींचा असतो. हे ट्यूमर मेंदूच्या कोणत्याही भागाच्या वाढीमुळे किंवा स्तन तसंच फुफ्फुसातील ट्यूमरच्या प्रसारामुळे होते. जर वेळेवर उपचार सुरू केले नाहीत तर त्याचा आकार मोठ्या संत्र्यासारखा मोठा होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं, मत आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबात कॅन्सरचा इतिहास, रेडिएशनचा संपर्क किंवा न्यूरोफायब्रोमेटोसिस सारखे अनुवांशिक आजार असल्यास ब्रेन ट्यूमरचा धोका अधिक वाढतो. मात्र जर ब्रेन ट्यूमर कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं वेळेवर ओळखली गेली तर उपचार अधिक प्रभावी होऊ शकतात. यामध्ये आपल्याला रूग्णाचा जीवही वाचवता येतो. यामध्ये काय लक्षणं दिसून येतात ते जाणून घेऊया.

ब्रेन ट्यूमर कॅन्सरचे संकेत काय आहेत?

सतत छातीत वेदना होणं

जर डोकेदुखी दररोज होत असेल, विशेषतः सकाळी, आणि औषधोपचाराने आराम मिळत नसेल, तर ती सामान्य गोष्ट नाही. यावेळी तुम्ही तातडीने डॉक्टरांची हे ब्रेन ट्यूमरचे पहिले लक्षण असू शकते.

दिसण्यात किंवा ऐकण्यात बदल

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ब्रेन ट्यूमर कॅन्सरच्या रूग्णांना दिसण्यात किंवा ऐकण्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. यावेळी अंधुक दृष्टी, एका डबल व्हिजन किंवा दृष्टी कमी होणं त्याचप्रमाणे अचानक ऐकू न येणं किंवा एका कानात आवाज येणं ही देखील ब्रेन ट्यूमरची लक्षणं मानली जातात.

अचानक झटके येणं

ज्या व्यक्तीला यापूर्वी कधीही झटके आले नाहीत तिला अचानक झटके येऊ लागले तर ती चिंतेची बाब असू शकते. कारण हे ब्रेन ट्यूमरच्या कॅन्सरमुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा मेंदूवर परिणाम होतो.

स्वभाव बदलणं

व्यक्तीच्या स्वभावात बदल अचानक बदल होणं, काही गोष्टी विसरणं, निर्णय घेण्यास अडचण येणं किंवा चिडचिड होणं यांसारखी लक्षणं मेंदूच्या कार्यात काही व्यत्यय येत असल्याचं दर्शवतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT