Chanakya Niti yandex
लाईफस्टाईल

Chanakya Niti: घरात पैसा सतत खेळता राहील; फक्त 'या' पद्धतीने करा दिवसाची सुरुवात

Ruchika Jadhav

भारतात आजवर एकापेक्षा एक अशा अनेक ज्ञानी व्यक्ती होऊन गेल्या आहेत. ज्ञानी व्यक्तींच्या यादीमधील आणखी एक म्हणजे आचार्य चाणक्य आहेत. आचार्य चाणक्य यांनी व्यक्तीला जीवन जगताना कोणत्या मार्गाने चालले पाहिजे यासाठी अनेक नियम आणि अटी सांगितल्या आहेत. त्याचे तंतोतंत पालन करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातील वाईक काळ कायमचा निघून जातो.

चाणक्य यांनी आपल्या दैनंदिन जीवनात कसे जगायचे? कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत याची देखील माहिती दिली आहे. काही व्यक्तींकडे पैसे टिकत नाहीत. अशा व्यक्तींसाठी सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात कशी केली पाहिजे याबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आज आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या नियामाची माहिती जाणून घेणार आहोत.

आरोग्याची काळजी घ्या

आपण सुदृढ आणि निरोगी असल्यास आरोग्यासाठी लागणारा खर्च अपोआप कमी होतो. त्यासाठी आपण निरोगी असणे महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सूर्योदय होण्याआधी आपला बिछाना सोडला पाहिजे. सूर्य डोक्यावर येईपर्यंत कधीच झोपू नये असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

सकाळी अंघोळ घेतल्यावर देव पुजा करावी आणि लगेचच नाश्ता करावा. सकाळी पोट भरलेलं असल्यास डोकं शांत राहतं. तसेच आपलं आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहते.

सकाळी कामांना अशी सुरूवात करा

सकाळी उठल्यावर प्रत्येकाला आपली कामे उरकून बाहेर पडायचे आसते. नोकरी करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती घराबाहेर पडतात. सर्व कामांना सुरुवात करण्याआधी प्रत्येक व्यक्तीने सुरुवातीला थोडा व्यायाम करावा. व्यायाम किंवा योगा केल्याने आपलं आरोग्य सुदृढ राहतं. शरीरासह मानसिक अडचणी सुद्धा याने दूर होतात.

आर्थिक स्थिती चांगली राहावी यासाठी करा हे काम

तुमची आर्थिक स्थिती छान असावी त्यासाठी सकाळी उठल्यावर सर्वात आधी सूर्य देवाची पुजा करा. अंघोळीनंतर सूर्य देवाला जल अर्पन करा. असे केल्याने तुम्हाला भविष्यात कोणत्याही आर्थिक अडचणी येणार नाहीत. तसेच भविष्यात सुद्धा आर्थिक समस्या उद्भवणार नाहीत, असं आचार्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar: चंद्रमुखीचा नवा लूक,'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' मध्ये साकारणार 'महाराणी येसूबाई भोसले'ची भूमिका

Maharashtra News Live Updates: राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळं काँग्रेसला बळ मिळेल - सतेज पाटील

Pune Crime: पुण्यात चाललंय काय? तरुणीचे अपहरण करून विनयभंग, बोपदेव घाटातील दुसरी घटना

Maharashtra Politics : आदिवासी आमदार आक्रमक, झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर मारली उडी

Khopa Hairstyle For Bride : लग्नात नऊवारी नेसणार आहात? मग ही खोपा हेअरस्टाईल नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT