Chanakya Niti: 'अशा' चुका करणाऱ्या व्यक्तींकडे कधीच टिकत नाही पैसा, तुम्हीही अजिबात असं करू नका

Chanakya Niti For Money : चाणक्य नीतीमध्ये आचार्यांनी बऱ्याच काही गोष्टींची माहिती दिली आहे. यामध्ये चाणक्यांनी काही चुका सांगितल्या आहेत, जर या चुका केल्या तर व्यक्ती आयुष्यभर गरीब राहू शकतो.
chanakya niti for money
chanakya niti for moneysaam tv
Published On

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी सांगितलं आहे. जर चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं वेळेत आचरण केलं तर ते तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. चाणक्य यांचा जन्म सुमारे 3 हजार वर्षांपूर्वी झाला होता. ते भारताचे एक महान तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि लष्करी रणनीतीकार होते. यावेळी चाणक्यांनी समाज, राष्ट्र, राजकारण आणि लष्करी क्षमता यावर नीती शास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याला चाणक्य नीती असं म्हटलं जातं.

चाणक्य नीतीमध्ये आचार्यांनी बऱ्याच काही गोष्टींची माहिती दिली आहे. याबद्दल आचार्य चाणक्यांनी पैशांबाबत देखील त्यांच्या ग्रंथामध्ये माहिती दिली आहे. या गोष्टींचं पालन केलं तर ते तुमचे फायद्याचे असणार आहे. यामध्ये चाणक्यांनी काही चुका सांगितल्या आहेत, जर या चुका केल्या तर व्यक्ती आयुष्यभर गरीब राहू शकतो. जाणून घेऊया या चुका कोणत्या आहेत.

अहंकारी व्यक्ती

चाणक्य नीतीमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, अहंकारी व्यक्तींकडे पैसा टिकत नाही. अशा व्यक्तींना लवकरच गरीबीचा सामना करावा लागतो.

chanakya niti for money
समुद्राच्या तळाशी सापडलं एक रहस्यमयी छिद्र; यामधून बाहेर पडणाऱ्या द्रव पदार्थाने वैज्ञानिकही हैराण

वायफळ खर्च

आपल्यापैकी काही व्यक्तींना वायफळ खर्च करतात. पण जर तुम्हीही असं करत असाल तर तुम्हाला ते भारी पडू शकतं. याचं कारण म्हणजे, जो व्यक्ती वायफळ खर्च करतो, त्याच्याकडे पैसा टिकत नाही, असं म्हटलं जातं.

कंजूस व्यक्ती

काही व्यक्ती फार कंजूस असतात, अशा व्यक्तींच्या हातातून पैसा कधीही सुटत नाही. या व्यक्ती त्यांच्याकडे असलेला पैसा खर्च करत नाहीत. मात्र यांच्याकडे पैसा कधीच टिकत नाही, असं चाणक्य नीतीमध्ये म्हटलं आहे.

आळसपणा

चाणक्य नीतीमध्ये असं म्हटलंय की, ज्या व्यक्ती आळशी असतात, त्या आयुष्यात कधीही श्रीमंत बनू शकत नाहीत. जर त्यांना त्यांच्या आयुष्यात पैसा हवा असेल तर आळस झटकून टाकावा लागेल.

chanakya niti for money
Mysterious Story: 'या' भागात एलियन्सचा कहर! लोकांना किडनॅप करत असल्याचा स्थानिकांचा दावा

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com