Maharashtra News Live Updates: अपघात झालेल्या वाहनात मी नव्हतोच: मंत्री संजय राठोड

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 4 October 2024: आज शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, महाराष्ट्रातला पाऊस, अक्षय शिंदे इन्काउंटर प्रकरण, पुण्यातील चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणासह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

अपघात झालेल्या वाहनात मी नव्हतोच: मंत्री संजय राठोड

यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला पहाटे दरम्यान कोपरा येथे अपघात झाला. या संदर्भात मंत्री संजय राठोड यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवून त्यात अपघात झालेल्या वाहनात मी नव्हतो आणि मी पूर्ण पणे सुखरूप आहे. ज्या वाहनाचा अपघात झाला. त्यात आपण नव्हतो, असे पालकमंत्री राठोड यांनी स्पष्ट केले. ऑल इंडिया बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करायची असल्याने दुसऱ्या वाहनाने प्रवास करीत होतो,असे पालकमंत्री राठोड यांनी स्पष्ट केले.या अपघाताची चौकशी करण्यात येणार असून, खासगी वाहनाला झालेल्या अपघातात चालक जखमी झाला आहे. जखमी झालेल्या चालकाला बाहेर काढून त्याला उपचारासाठी यवतमाळ पाठविण्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.

महाराजांच्या दोन्ही हातात दोन शस्त्र असणारा हा देशातला पहिला पुतळा

कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. याचे अनावरण आज सायंकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही हातांमध्ये दोन शस्त्र या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये दाखवण्यात आलेली आहेत. महाराजांच्या दोन्ही हातात दोन शस्त्र असणारा हा देशातला पहिला पुतळा असणार असल्याची माहिती काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनी साम टीव्ही सोबत बोलताना दिलेली आहे.

शरद पवार अभ्यासू नेते आहेत. त्यांनी याबद्दल अभ्यास केला असणार. आरक्षण मर्यादा वाढवली तर आनंदच पण ते कोर्टात देखील टिकायला हवं
हिरामण खोसकर

हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी कॅाग्रेस शरद पवार पक्षातील प्रवेश देखील खडतर ठरण्याची शक्यता

कोणत्याही अटी किंवा शर्तीशिवाय पक्षात प्रवेश करण्याची राष्ट्रवादी कॅाग्रेसची हर्षवर्धन पाटील यांना अट घालण्यात आली.

- ⁠इंदापुर मधून विधानसभेला उमेदवारी देण्याचं आश्वासन नाही

- ⁠तुम्हाला पक्षात यायचे आहे, त्यामुळे तुम्हीच पक्षात येणार असल्याचे जाहीर करा. राष्ट्रवादीची हर्षवर्धन पाटील यांना सुचना.

अरबी समुद्रात जाऊन संभाजीराजेंच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश कदम व सरचिटणीस धनंजय जाधव यांनी आंदोलनाच्या ठिकाणाची पाहणी केली.

SSC Exam : सोमवारपासून दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यास येत्या सोमवारपासून सुरवात होणार आहे.

दहावीची परीक्षा देणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून ऑनलाइन पद्धतीने शाळा प्रमुखांमार्फत भरून घेण्यात येणार आहेत.

मराठा आरक्षणासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधायकामध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू - शरद पवार

मराठा आरक्षणासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधायकामध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू. 50 टक्के आरक्षणावर जाता येत नाही, पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे, दुरुस्ती करायला काय हरकत नाही. 50 टक्केच 75 टक्क्यांवर जायला पाहिजे..तमिळनाडूमध्ये 78% वर आरक्षण जातं तर महाराष्ट्रात 75% वर का होऊ शकत नाही? 75 टक्के झाल्यास सगळ्यांनाच आरक्षण मिळेल ज्यांना मिळालं नाही त्यांनाही मिळेल कोणताही वाद उरणार नाही.
शरद पवार

Nashik  : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेकडून जल्लोष

- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेकडून जल्लोष

- नाशिकच्या कुसुमाग्रज स्मारकात शिंदेंच्या शिवसेनेचा जल्लोष

- ढोल ताशाचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करत शिंदेंच्या शिवसेनेचा जल्लोष

- शिवसैनिकांनी पेढे वाटून साजरा केला आनंद

- अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचे मानले आशीर्वाद

Maharashtra Politics : संदीप नाईक यांना पदावरून काढण्याची मागणी.

भाजपच्या माजी नगरसेवकाकडून भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना पदावरून काढण्याची मागणी.

संदीप नाईक यांच्याकडून वारंवार त्रास देण्यात येत असल्याचा केला आरोप.

जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या ऐवजी सर्वसमावेशक जिल्हाध्यक्ष द्या.

माजी नगरसेवक भरत जाधव यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी.

संदीप नाईक यांच्या उमेदवारीला देखील विरोध करत संदीप नाईकांना उमेदवारी दिल्यास अपक्ष लढण्याचा दिला इशारा.

नवी मुंबई भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर.

MIM चा मविआला 28 जागांसाठीचा प्रस्ताव,

गेल्या दोन महिन्यांपासून MIM पक्ष हा महाविकास आघाडी बरोबर येण्यासाठी इच्छुक आहे, असं प्रसार माध्यमाद्वारे ऑफर देणाऱ्या एमआयएमच्या प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आता महाविकास आघाडीकडे 28 जागांसाठीचा प्रस्ताव दिला आहे अशी चर्चा आहे.

Indapur News: इंदापूर शहरातील भाजप कार्यालयाचे पोस्टर काढले

इंदापूर शहरातील भाजप कार्यालयाचे पोस्टर काढले

मोदी, शहा, फडणवीस बावनकुळे यांचे फोटो हटविले

काल रातोरात शहरातील भाजप कार्यालयाचे सर्व फोटो व फ्रेम काढून टाकल्या

आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांची भूमिका मांडणार

पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार

Mumbai News: कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी गुन्हा दाखल

कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी गुन्हा दाखल.

३० जणांविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

बुक माय शो च्या तक्रारीवर करण्यात आला गुन्हा दाखल.

संशयितांची नाव, मोबाईल क्रमांक, त्यांच्या संकेतस्थळांची तसेच समाज मध्यमांवरील खात्यांची माहिती केली बुक माय शो ने पोलिसांकडे सुपूर्द.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com