Eye care Tips
Eye care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Eye care Tips : दाट आणि आकर्षित आय लॅशेस दिसण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा !

कोमल दामुद्रे

Beautiful Eyelashes : आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य वाढवण्यासाठी महिलांचे नेहमीच वेगवेगळे प्रयत्न सुरू असतात. त्यात चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी डोळ्यांची मुख्य भूमिका असते.  त्यामुळे रोज डोळयात काजल लावणे, मस्करा, आय लायनर त्यासोबतच डोळ्यांसाठी उपलब्ध असलेले इतर प्रोडक्ट्स वापरुन डोळे आकर्षित दिसण्यासाठी करतात.

मात्र या प्रॉडक्टमध्ये असलेल्या केमिकल्समुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकतो. तसेच डोळ्यांजवळील त्वचेसाठीदेखील (Skin) हे प्रॉडक्ट हानिकारक असू शकतात.  

मस्करा आणि आय लॅशेसचा वापर केल्यामुळे पापण्यांची वाढ कमी होते आणि पापण्या खूप विरळ दिसू लागतात. त्यामुळे तुम्हाला नैसर्गिक गोष्टीचा वापर करून पापण्या दाट  करण्याची गरज आहे. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्याचे पालन करून तुम्ही सुंदर आणि आकर्षित आय लॅशेस मिळवू शकता.

1. पापण्या स्वच्छ करा

पापण्यांच्या वाढीसाठी तुम्हाला काही नैसर्गिक गोष्टी पापण्यांच्यावर अप्लाय करण्याची गरज आहे.  त्यामुळे चेहरा धुताना पापण्याही व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मेकअप केला असेल खास तेव्हा पापण्या स्वच्छ (Clean) करायला विसरू नका.

2. एरंडेल तेल

कॉटन बॉलच्या सहाय्याने एरंडेल तेल हलक्या हाताने पापण्यांवर लावा आणि बोटांनी हळूहळू मालिश करा.   रात्री झोपण्यापूर्वी पापण्यांवर अशाप्रकारे एरंडेल तेल  अप्लाय करा. दुसऱ्या दिवशी सकाळी पापण्या पाण्याने (Water) धुवा. आयब्रो दाट करण्यासाठी ही तुम्ही ही पद्धत वापरू शकता.

3. कोरफड

रात्री झोपण्यापूर्वी पापण्या स्वच्छ करून त्यावर कापसाच्या मदतीने एलोवेरा जेल लावा. हलक्या हाताने पापण्यांवर एलोवेरा जेल लावून बोटांनी हळूहळू मालिश करा आणि रात्रभर तसेच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्याने धुवा.

4. पेट्रोलियम जेल

पेट्रोलियम जेलच्या मदतीने तुम्ही सुंदर आणि दाट आय लॅशेस मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला आठवड्यातून कमीत कमी तीन दिवस पेट्रोलियम जेल वापरणे गरजेचे आहे. पेट्रोलियम जेल रात्री झोपण्यापूर्वी पापण्यांवर लावून सोडून द्या आणि सकाळी सकाळी पाण्याने धुवा. असे तुम्हाला आठवड्यातून किमान तीन दिवस करायचे आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT