Beauty Care Tips : पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी फॉलो करा 'या' ब्युटी टिप्स !

Beauty Hacks : या क्षणाला खास बनवण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी स्वतःच्या स्किनकडे जास्त लक्ष देतात.
Beauty Care Tips
Beauty Care TipsSaam Tv

Skin care Tips : प्रत्येक व्यक्ती आपल्या पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी काहीना काही तयारी नक्कीच करतो. सोबतच मुली या दिवसाला लक्षात घेऊन स्वतःच्या चेहऱ्याकडे जास्त लक्ष देतात.

या क्षणाला खास बनवण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी स्वतःच्या स्किनकडे जास्त लक्ष देतात. तुम्हाला सुद्धा तुमचे हे क्षण खास बनवायचे असतील व सुंदर दिसायचे असेल तर या टिप्स (Tips) करा.

Beauty Care Tips
Beauty Tips : सतत लिपस्टिक लावण्याचा तुम्हालाही कंटाळा येतोय ? तर 'या' टिप्स फॉलो करुन ओठांचे सौंदर्य टिकवा

1. कोरियन स्किन केअर रुटीन :

आजकाल कोरियन केअर स्किन रुटीन जास्तच चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. या स्किन केअर रुटीनला फॉलो करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणू शकता. या स्किन केअर रुटीनला फॉलो करण्यासाठी कोरियन शीट मास्क वापरा. या शीट मास्कमुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल.

2. फेस शीट मास्क कशा पद्धतीने वापरावे :

तुम्हाला बाजारामध्ये आरामात शीट मास्क मिळेल. तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार शीटमास्क खरेदी करा. तुम्ही शीटमास्क चेहऱ्याला लावा. पंधरा ते वीस मिनिटे झाल्यानंतर शीटमास्कला चेहऱ्यावरून (Skin) काढून टाका आणि हलक्या हाताने मसाज करा. लक्षात ठेवा तुम्हाला शीटमास्क काढून टाकल्यावर चेहरा पाण्याने (Water) धुवायचा नाही आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला कोरियन सारखी ग्लोविंग स्किन भेटेल.

Beauty Care Tips
Skin Care Tips : त्वचेची काळजी घेण्यासाठी काकडीचा असा करा उपयोग, त्वचा चमकण्यासोबत वृद्धत्वाचा प्रभावही कमी होईल!

3. मेकअप :

सुंदर दिसण्यासाठी मेकअप करणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांना लाईट मेकअप आवडतो. तेव्हा तुम्ही नो मेकअप लूक कॅरी करू शकता. यासाठी तुम्ही चेहऱ्यावरती बीबी क्रीम लावू शकता. यानंतर पिंक आयशॅडो आणि पिंक लिपस्टिक लावा. त्यानंतर गुलाबाच्या ब्लाशरने तुमचा मेकअप कंप्लीट करा.

Beauty Care Tips
Beauty Care TipsCanva

4. फॅशन स्टाईल :

तुम्ही लाल रंगाचे कपडे परिधान करू शकता. लाल रंग हा प्रत्येक स्किन टोनवर चांगला दिसतो. खास करून इंडियन स्किन टोनवर लाल रंग जास्त उठून दिसतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com