मुंबई : गरोदरपणात आपल्या शारीरिक व मानसिक स्थितीत अनेक प्रकारचे बदल होत असतात. अशावेळी खाण्यापिण्याच्या सवयींवर आपण अधिक लक्ष देतो.
हे देखील पहा-
प्रसूतीपूर्व आपल्या आरोग्यात बदल होतात तसेच आपल्या त्वचेवर देखील बदल जाणवतात. शरीराचे सौंदर्यं आपल्या सर्वांना जपायला आवडते. प्रसुतीमध्ये आपल्या पोटावर स्ट्रेच मार्क्स येतात. तसेच पोटाला सतत खाज लागते. हे स्ट्रेच मार्क्स प्रसूतीनंतर देखील तसेच राहतात. त्यामुळे त्याचे व्रण, सुरकत्या दिसू लागतात. अनेकदा हे व्रण ओटीपोटीवर व मांड्यांवर देखील असतात. परंतु, याचे कारण आपले वाढलेले वजन असते. शरीरात होणाऱ्या बदलामुळे व त्वचेवर ताण आपल्यामुळे स्ट्रेच मार्क्स येतात. प्रसतूतीनंतर साडी नेसल्यानंतर पोटावर मार्क्स दिसतात ते घालवण्यासाठी आपण काय करू शकतो हे जाणून घेऊया.
१. गरोदरपणात महिलांचे वजन वाढू लागते. त्यामुळे आपल्याला पोटाच्या आजूबाजूचा भाग वाढू लागतो. त्यामुळे पोटावर व कमरेवर स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात. त्यामुळे हे व्रण लपवण्यासाठी आपण असे कपडे परिधान करतो ज्यामुळे आपले स्ट्रेच मार्क्स दिसणार नाही.
२. हे मार्क्स अधिक जास्त असल्यामुळे क्रीम, तेलाचा वापर करु शकतो. त्यामुळे ते कमी होऊ शकतात. आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर वापरल्यास त्वचेमध्ये क्रीम व तेल चांगल्या प्रकारे प्रवेश करते आणि त्वचा मऊ आणि कोमल ठेवते.
३. स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी भरपूर पाणी (Water) प्या, विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ खा आणि नियमित व्यायाम करा ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. महिलांनी गरोदरपणात बदामाच्या तेलाने त्यांच्या त्वचेची मालिश केल्यास डाग कमी होण्यास मदत होते.
४. रेटिनॉलचा वापर करुण आपण स्ट्रेच मार्क्सपासून मुक्त होऊ शकतो. रेटिनॉलमध्ये जीवनसत्त्व (Vitamins) ए आढळते. जे स्ट्रेच मार्क्स बरे करण्यासाठी आवश्यक असते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.