boost children's immunity during corona ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

कोरोना काळात मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

पावसाळा सुरु झाल्यामुळे सर्दी व खोकल्यासारखे आजार उद्भवू लागतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मुलांची प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. पावसाळा सुरु झाल्यामुळे सर्दी व खोकल्यासारखे आजार उद्भवू लागतात.

हे देखील पहा-

पुन्हा वाढलेला कोरोना पाहता आपल्याला मुलांची चिंता वाटणे सहाजिकच आहे. सध्याच्या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे. या धोकादायक काळात लहान मुलांच्या आरोग्यावर या विषाणूचा परिणाम होऊ नये यासाठी मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. मुलांची प्रतिकारशक्ती कशी मजबूत करता येईल आणि ती मजबूत करण्यासाठी त्यांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा हे जाणून घेऊया.

१. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी त्यांच्या नियमित आहारात केशर आणि हळदीच्या दुधाचा समावेश करा. या दुधाचे सेवन केल्याने मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील आणि आजारांशी लढण्यास मदत होते. हळदीचे दूध प्यायल्याने खोकला दूर होतो. त्यात असणाऱ्या अँटीबायोटिक्समुळे शरीराच्या मुक्त रेडिकल पेशींशी लढण्यास मदत होईल. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि रोगांचा धोका कमी होतो.

२. कोरोना (Corona) विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोमट पाण्यात (Water) थोडेसे मीठ टाकून मुलांना दिवसातून किमान दोनदा गुळणा करा. गुळणा केल्याने मुलांवर विषाणूचा कोणताही प्रभाव पडणार नाही आणि मुलांची रोगप्रतिकारशक्तीही मजबूत राहील.

३. व्हिटॅमिन डी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती प्रभावी ठेवते आणि कोणत्याही प्रकारच्या विषाणूजन्य संसर्गाशी लढण्यास मदत करते. यामुळे सर्दी आणि फ्लू तसेच कोरोना विषाणूपासून संरक्षण होईल. त्यामुळे मुलांच्या आहारात व्हिटॅमिन डी-युक्त पोषक तत्वांचा समावेश करा.

४. मुलांच्या आहारात भाज्या आणि फळे समाविष्ट करण्याबरोबरच, त्यांना प्रथिनेयुक्त आहार देणे आवश्यक आहे ज्यामध्ये डाळी, दूध, दही आणि सर्व पोषक तत्वांचा समावेश करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

EPFO : मालक PF कापतो का? 2 मिनिटांत तपासा, वाचा सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT