Chanaky Niti Saam Tv
लाईफस्टाईल

Chanaky Niti : चाणक्याचे 'हे' शब्द पाळा, जीवनात फसवणूक कधीच होणार नाही!

यशाचे शिखर गाठत असताना सर्वात मोठा अडथळा म्हणजे फसवणूक होय.

कोमल दामुद्रे

Chanaky Niti : समोरच्या व्यक्तीला आपल्या बुद्धीने पराभव करणार आचार्य चाणक्य होते. त्यांनी मानवी जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्यातील काही गोष्टी म्हणजे यश, फसवणूक याबद्दल सांगितले आहे.

यशाचे शिखर गाठत असताना सर्वात मोठा अडथळा म्हणजे फसवणूक होय. त्यामुळे चाणक्याच्या काही गोष्टीचे पालन करून आयुष्यात फसवणूक होणार नाही आणि यशाच्या (Success) मार्गात पुढे जाण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊ याविषयी चाणक्य नीति काय आहे?

1. वाणी आणि संगत

वाणी ही अशी गोष्ट आहे जी माणसाला जमिनीवरून जमिनीवर घेऊन जाऊ शकते आणि खड्ड्यातही टाकू शकतो. त्यामुळे बोलताना नेहमी विचार करून बोलले पाहिजे.आपल्या बोलण्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. आयुष्यात पुढे जायचे असेल तर नेहमी गोड वाणीचा वापर करा तसेच सज्जनांचा सहवास असणे गरजेचे आहे. त्याने तुमचे व्यक्तिमत्व वाढते आणि तुम्ही आयुष्यात चुकीचा मार्गी जात नाही.

2. कठीण परिश्रम

खूप लोकांना असे वाटते की मेहनत न करता त्यांना यश मिळाले पाहिजे आणि असे बोलून ते सर्व काही नशिबावर सोडून देतात.मेहनत करण्यापासून चोरी करू लागतात.त्यावर आचार्य चाण्यक यांचे असे मत आहे की जे कठोर परिश्रम करत नाहीत. सरळ स्वतःला नशिबावर सोडून देतात.असे लोक आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही.अशा वेळी कठोर परिश्रम करून यशाचे शिखर गाठले पाहिजे.

3. कुटुंब (Family)

आचार्य चाणक्य नीतिनुसार जो व्यक्ती स्वतःच्या कमाईने संतुष्ट असतो त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तसेच जर कुटुंबात आज्ञाधारी पत्नी (Wife) आणि आदरणीय मुले असतील तर अशा व्यक्तीचे आयुष्य स्वर्गापेक्षाही सुंदर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

Aadhaar Card: आधार कार्ड हरवलं? घाबरू नका, २ मिनिटांतच मिळवा आधार क्रमांक; फक्त फोलो करा या स्टेप्स

मोठी बातमी! शनिवारी दुपारी २ नंतर १४ तासांचा जम्बोब्लॉक, या एक्सप्रेस-लोकल रद्द, अनेकांचे मार्ग बदलले, पाहा सविस्तर माहिती

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT