Fenugreek water  yandex
लाईफस्टाईल

Hair Care: केसांच्या वाढीसाठी आणि मजबूत करण्यासाठी मेथीचे दाणे ठरतील फायदेशीर, असा वापर करा

Fenugreek Seeds Water for Hair Growth: मेथीमध्ये अनेक गुणधर्म आहेत जे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केसांसाठी मेथीच्या पाण्याचे फायदे आणि ते वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेथीच्या दाण्यांचा वापर अनेक आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. मेथीमध्ये प्रथिने, निकोटिनिक अॅसिड, आयरन, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक आढळतात. जे केसांना मजबूत आणि जाड बनवण्यास मदत करतात. मेथीचे पाणी केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, मेथीचे पाणी केसांना लावल्याने कोणते फायदे मिळूतात. जाणून घ्या.

डोक्यातील कोंडा आणि स्कॅल्प इन्फेक्शन

मेथीमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे कोणत्याही प्रकारचे स्कॅल्प इन्फेक्शनपासून संरक्षण करतात. तसेच हे कोंडा, खाज आणि कोरडेपणा दूर करण्यास मदत करतात. मेथीचे पाणी नियमितपणे लावल्याने स्कॅल्प निरोगी राहते.

केसांची वाढ होते

मेथीच्या दाण्यांमध्ये लेसिथिन आढळते. जे केसांना पोषण देतात आणि त्यांची वाढ करण्यास मदत करतात. मेथीच्या पाणी लावल्याने स्कॅल्पचे ब्लड सर्क्युलेशन सुधारते. यामुळे नवीन केस लवकर उगतात. तसेच मेथीच्या दाण्यांचे पाणी केसांना कंडीशन करतात. ज्यामुले केस सॉफ्ट आणि चमकदार होतात.

पांढऱ्या केसांची समस्या

मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि आयरन भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे वेळेआधीच केस पांढरे होण्याच्या प्रक्रियेला मंदावतात. तसेच केसांचा नैसर्गिक रंग बराच काळ टिकवून ठेवण्यास मदत करतात.

स्कॅल्पला हायड्रेटेड ठेवते

मेथीचे पाणी स्कॅल्पला मॉइश्चरायझ करतात. यामुळे कोरडेपणा आणि खाज सुटण्याची समस्या दूर होते. मेथीचे पाणी केसांच्या मुळांना पोषण देतात. आणि त्यांना हेल्दी बनवतात. यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते.

केसांसाठी मेथीचे पाणी कसे बनवायचे?

२ ते ३ चमचे मेथीचे दाणे एक कप भर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे भिजलेले दाणे बारीक करून पेस्ट बनवा आणि पाणी गाळून घ्या. हे पाणी स्कॅल्प आणि केसांना लावा आणि ३०-४० मिनिटे तसेच ठेवा. नंतर शॅम्पूने केस धुवा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Hindi Sakti : हिंदी सक्तीविरोधात शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल | VIDEO

Weight loss tips : आता वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज नाही, फक्त या ३ गोष्टी लक्षात ठेवा

Pune Rave Party: खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, त्याच सूटमध्ये २४ तास आधीही रंगली होती पार्टी

नवऱ्याला रेव्ह पार्टीत बेड्या, २४ तासानंतर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया, दोन ओळीत विषय संपवला

SCROLL FOR NEXT