
आजच्या डिजिटल युगात, मोबाईल प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. संवाद साधण्यासाठी, मनोरंजनासाठी, कोणतीही माहिती मिळवण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टींसाठी मोबाईलचा वापर करतो. मोबाईलचा जास्त वापर केल्याने आपल्या आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की दररोज एक तास किंवा त्याहून अधिक वेळ सतत मोबाईल वापरल्याने तुमच्या आरोग्यावर काही गंभीर परिणाम होऊ शकतो. जर तुम्हीही तासनतास फोन स्क्रोल करत असाल तर याचा आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
डोळ्यांच्या समस्या
मोबाईल स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांसाठी हानिकारक असतो. जास्त वेळ स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांची जळजळ, अंधुक दृष्टी आणि डोकेदुखी सारखी समस्या होऊ शकते. याशिवाय, दृष्टी खराब देखील होऊ शकते.
मायग्रेन आणि डोकेदुखी
मोबाईलचा सतत वापर केल्याने डोळ्यांवर ताण येतो. यामुळे डोकेदुखी किंवा मायग्रेन होऊ शकते. ज्यांना आधीच मायग्रेनचा त्रास आहे. त्यांनी सतत मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. अशा प्रकारचे आजार टाळण्यासाठी मोबाईल कमी प्रमाणात वापरा.
वजन वाढू शकते
जर तुम्ही फोन जास्त वेळ वापरत असाल तर त्यामुळे शारीरिक हालचाल कमी होऊ शकते. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो.
झोपेची समस्या
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरल्याने शरीरात मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन कमी होते. चांगल्या झोपेसाठी मेलाटोनिन हार्मोन आवश्यक आहे. आणि तुमच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
ताण वाढतो
आजकाल लोक सोशल मीडियावर तासनतास घालवतात. परंतु सतत मोबाईल वापरल्याने तुम्हाला ताण, चिंता आणि नैराश्यासारख्या समस्याना सामोरे जावे लागू शकते.
मान आणि पाठदुखी
मोबाईल फोन वापरताना लोक मान आणि पाठ वाकवून ठेवतात. यामुळे टेक्स्ट सिंड्रोमची समस्या उद्भवू शकते. या सवयीमुळे पाठ आणि मान दुखू शकते. जर सवय बदलली नाही तर भविष्यात अधिक गंभीर समस्या होऊ शकतात.
अशी घ्या काळजी
मोबाईल वापरण्यासाठी एक वेळ निश्चित करा. त्यापेक्षा अधिक वेळ मोबाईल वापरु नका.
झोपण्यापूर्वी मोबाईल बेडपासून लांब ठेवा. जेणेकरुन तुमची स्लीप सायकल खराब होणार नाही.
मोबाईलमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांसाठी हानिकारक असतो. यासाठी मोबाईलमध्ये नाइट मोड ऑन करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.