Methi Benefits
Methi Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Methi Benefits : हिवाळ्यातील अनेक संसर्गजन्य आजारांवर फायदेशीर ठरतील मेथीची पाने !

कोमल दामुद्रे

Methi Benefits : हिवाळ्यात अनेक वेगवेळ्या हिरव्या भाज्याचा सिझन असतो आणि त्या भाज्या हिवाळ्यातच खायला पाहिजे असे म्हटले जाते. त्यातील मेथीची भाजी हिवाळ्यातच येत असते.

यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पालक, हरभरा, मेथी या भाज्या मार्केटमध्ये सहज मिळतात या सिझनल भाज्या खाल्याने तुमचे आरोग्य निरोगी राहील. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीची भाजी मदत करते. मेथीच्या बिया पण तितक्याच गुणकारी आहेत त्याचे लाडू बनवून हिवाळ्यात खाल्ल्यावर हातापायात येणारा वात कमी होतो असे म्हटले जाते. चला तर मग आता आपण मेथीच्या भाजीचे फायदे जाणून घेऊया.

1.मेथीच्या भाजीतून मिळणारे पोषकतत्व

मेथीच्या भाजीतून एकच नाही तर खूप पोषकत्त्व मिळतात. सोडियम, फायबर, व्हिटॅमिन (Vitamins), जींक, कार्बोहाइड्रेट, आयन, मॅगनीज ,पोटॅशियम, कॅल्शियम,प्रोटीन, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी इतके पोषकतत्व मेथीच्या भाजीतून मिळतात.

2. मधुमेहासाठी फायदेशीर (Benefits)

मधुमेह (Diabetes) नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीची भाजी फायदेशीर आहे. मेथीमुळे ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही नियंत्रित राहते म्हणून मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीची भाजीचा तुमच्या आहारात समावेश करा.

3. वजन कमी करण्यासाठी

मेथीची भाजी खाल्ल्याने सारखी सारखी भुख लागत नाही तुमचे पोट भरून राहते आणि शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषकतत्व मिळत असतात.जास्ती खाण्याची इच्छा होत नसल्याने तुमचे वजन कमी (Weight loss) होण्यास मदत होते.

Fenugreek seeds

4. हृदयासाठी फायदेमंद

मेथी शरीरातील वाईट कॉलेस्ट्रॉल कमी करते आणि सुधारित रक्तप्रवाह करते.मेथी हृदयाशी संबधित आजार (Disease) कमी करण्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे तुमच्या आहारात (Food) मेथीच्या भाजीचा समावेश करा.

6. प्रजनन क्षमतेसाठी

टेस्टोस्टेरॉन आणि शुक्राणूंची संख्या वाढिण्यासाठी फायेशीर आहे.२०१७ च्या एका अभ्यासानुसार ३ महिन्यासाठी ५० पुरुषांना मेथीचा अर्क देण्यात आला त्यातील ८८ टक्के पुरुषांच्या शुक्राणूं संख्येत वाढ झाली होती. मेथी मानसिक स्थिरतेसाठी मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT