When everything feels fine outside but empty inside — your mind may be asking for attention, not distraction. 
लाईफस्टाईल

Boredom Signs: 'काही समजं ना, काही उमजं ना', नुसतं मन तळमळतंय? कशाची आहेत ही लक्षणं? जाणून घ्या

Boredom Signs: सगळं काही परिपूर्ण असूनही तुम्हाला रिकामे आणि निराश वाटतंय का? याचा अर्थ काय? मन उदास का होतं. कंटाळा का वाटतो? हे कशाचे लक्षण आहेत, हे जाणून घेऊ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • बाहेरून सर्व ठीक असलं तरी मन रिकामं वाटू शकतं.

  • ‘बोअरडम’ ही केवळ कंटाळा नसून मानसिक संकेत असू शकतो.

  • मनाला विश्रांती आणि आत्मपरीक्षणाची गरज असते.

सगळं काही सुरळीत सुरू असतानाही अचानक मन रिकामपण वाटू लागतं. अचानकपणे मन उदास होतं. काही करू वाटत नाही. एकांतात राहू वाटतं. नुसतं अंथरुणात पडून राहावं वाटतं, पण हे कशाचं लक्षण आहे, ते जाणून घेऊ. दरम्यान ही आजच्या काळातील एक मोठी समस्या आहे. आपण याला 'बोअर' होणं म्हणतो असतो, पण मानसशास्त्रात या स्थितीला खोलवर अर्थ आहेत.

हातात चांगली नोकरी आहे, कुटुंब सुखी आहे, आरोग्याच्या तक्रारीही नाहीत, तरीही मनाला एक प्रकारची मरगळ येत असते. इंग्रजीत याला 'Boredom' म्हणतात. पण हे केवळ रिकामपण नसून ते मनाचे एक 'लक्षण' आहे. पण हे का होतं, हे जाणून घेऊ. दरम्यान बोअरडम ही तुमच्या मनाने मागितलेली एक छोटी विश्रांती असते. तुम्हाला स्वतःला थोडा वेळ देण्याची आणि बाहेरच्या जगापेक्षा आतल्या जगाकडे पाहण्याची गरज आहे, हे सांगण्याचं लक्षण असतं.

प्रोत्साहन नसणं

जेव्हा आपल्या मेंदूला नवीन काहीतरी शिकायला मिळत नाही. तसेच आव्हाने मिळत नाहीत, तेव्हा आपला मेंदू 'लो मोड'वर जात असतो.

साचेबद्ध जीवनशैली

दररोज तेच काम, तोच रस्ता आणि तोच दिनक्रम यामुळे मनातील उत्साह संपत असतो. मनातील ताजेपणा राहत नाही. त्यामुळे व्यक्तीला बोअर वाटू लागते.

मानसीक थकवा

आपण मोबाईलवरील सतत रिल पाहत असतो. सोशल मीडियामधील रिल स्क्रोल केल्यामुळे मेंदूला 'डोपामाइन'ची जास्त सवय होते. यामुळे साध्या आणि शांत गोष्टी आपल्याला बोअर वाटू लागतात.

भावनिक रिक्तता

आपण आपल्या भावना दाबून ठेवतो, ज्यामुळे मन तटस्थ होते आणि कशातच रस उरत नसतो.

बोअर होण्यापासून वाचण्यासाठी काय कराल?

मानसशास्त्रज्ञाच्या मते, बोअर होणं वाईट नसते. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही, तेव्हा तुमचा मेंदू अधिक 'क्रिएटिव्ह' होत असतो. फोन बाजूला ठेवा आणि शांत बसा. नवीन कल्पना सुचण्यासाठी ही रिकामी जागा गरजेची असते.

'मायक्रो-चॅलेंजेस'

मोठं काहीतरी करण्याऐवजी छोट्या गोष्टी बदला. ऑफिसहून घरी जाण्याचा रस्ता बदला. जर तुम्ही स्त्री आहात तर एखादा नवीन पदार्थ बनवून पाहा. आपल्या जुन्या मित्रांना फोन करा. असे छोटे बदल मेंदूला ताजेतवाने करतात. कुठेतरी निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी फिरायला जा. यामुळे डोळ्यांना आणि मनाला विश्रांती मिळेल.

छंद जोपासा

लहानपणी तुम्हाला काय करायला आवडायचं? त्या गोष्टी करा. चित्रकला, वाचन, संगीत आदी गोष्टी आवडत असतील तर त्या पुन्हा एकदा करा. छंद हे मनाला उर्जा देणारे पॉवर हाऊस असतं. यासह कधीकधी शरीरात ऊर्जा नसल्यामुळेही मन मरगळतं. त्यामुळे १० मिनिटांचा व्यायाम किंवा वेगाने चाला. याच्याने शरीरातील 'हॅपी हार्मोन्स' वाढवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hairstyles For Long Face Women: नेहमीच्या हेअर स्टाइल्स विसरा; ट्राय करा 'या' आकर्षक अन् युनिक Hair Styles, तुम्हीच दिसाल सुंदर

Sunday Horoscope: पैशाची तंगी भासेल, 'या' राशीच्या लोकांनी डोकं ठेवा शांत; वाचा रविवारचे राशीभविष्य

मुख्यमंत्री सौर कृषी योजनेत १०,००० कोटींचा महाघोटाळा, महाराष्ट्रात खळबळ|VIDEO

Maharashtra Live News Update: रायगडच्या महाडमध्ये राहुल गांधी यांच्या निषेधार्थ शिंदे सेनेचे आंदोलन

Dal Fara Recipe : संध्याकाळी घ्या देसी नाश्त्याचा आस्वाद, 'हा' पदार्थ खाताच मोमोज विसरून जाल

SCROLL FOR NEXT