Water Saam Tv
लाईफस्टाईल

शरीरात डिहायड्रेशन जाणवते? 'या' उपायांनी वाढवा पाण्याचे प्रमाण

उन्हाळ्यात योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी पुरेशा प्रमाणात सेवन न केल्यास शरीरात डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळ्यात योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी पुरेशा प्रमाणात सेवन न केल्यास शरीरात डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. जरी तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर पाणी पिल्याने तुम्हाला फायदा जाणवू शकतो. यासोबतच आपण पहिले असेल जेव्हा सेलेब्सना त्यांच्या चमकणाऱ्या त्वचेचे रहस्य विचारले जाते तेव्हा ते पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देतात.

उपाय;

1) पाणी पिण्याचे शेड्युल तयार करा;

जर तुम्हाला शरीरात पिण्याच्या पाण्याचे प्रमाण वाढवायचे असेल तर तुम्ही स्वतःसाठी एक वेळापत्रक ठरवावे. सकाळी उठल्याबरोबर दोन ग्लास पाणी प्या. सुरुवातीला हे अवघड जाईल पण हळूहळू हे करण्याची सवय होईल. यासोबतच दर दोन तासांनी एक ग्लास पाणी प्या. दिवसभरात 6 ते 7 ग्लास पाणी पिण्याचे सांगितले जाते. त्यामुळे तुम्ही पुरेसे पाणी प्या. परंतु हे ही लक्षात ठेवा की, जास्त पाणी आपल्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे तुमच्या शरीरातील पेशी सुजू शकतात, ज्यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते.

२) आहारात पाण्याने युक्त फळांचा समावेश करा;

पाण्याने युक्त फळे खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. त्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी पपई, संत्री, द्राक्षे, टरबूज, स्ट्रॉबेरी आणि सफरचंद ही फळे खा. दुसरीकडे, तुम्ही भाज्यांमध्ये ब्रोकोली, कांदे, फ्लॉवर, मटार आणि टोमॅटो खाऊ शकता. या गोष्टी खाल्ल्याने व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरताही पूर्ण होऊ शकते.

३) साखरयुक्त आणि कॅफिनयुक्त पेयांपासून दूर राहा;

पाणी पिण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी कॅफिनयुक्त पेये कमी करा. कोला, सोडा, कॉफी यांसारख्या वस्तू घेणे टाळा. यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. यामुळेच हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Air Pollution : वायू प्रदुषणामुळे पाकिस्तानात आणीबाणी, तब्बल 20 लाख लोकांची प्रकृती बिघडली, लाहोरमधला आकडा धक्कादायक

Screenshot ला मराठीत काय म्हणतात? ९९ टक्के लोकांना माहिती नसेल उत्तर

KVP Yojana: खुशखबर! या योजनेत गुंतवलेले पैसे होणार डबल, गुंतवणूदारांना फायदाच फायदा; योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

VIDEO : मोदींना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे, राहुल गांधींचा हल्लाबोल | Marathi News

Mumbai Local Mega Block: प्रवाशांनो कृपया लक्ष असूद्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहून पडा घराबाहेर

SCROLL FOR NEXT