Father and Son Relationship Saam TV
लाईफस्टाईल

Father and Son Relationship : वडिलांच्या मृत्यूपूर्वी प्रत्येक मुलाने त्यांना या ५ गोष्टी सांगितल्याच पाहिजेत

Relationship Tips: जेव्हा मुलगा मोठा होतो तेव्हा त्याला आपल्या वडिलांनी आपल्यासाठी घेतलेले सर्व कष्ट आठवतात. वडिलांच्या कठोर भावनेमागे असलेले अश्रू आणि काळजी मुलाला तो स्वत: जेव्हा मोठा होतो तेव्हा समजते.

Ruchika Jadhav

प्रत्येक घरात बाबा आपल्या मुलापेक्षा मुलीला जास्त जीव लावतात. मात्र त्यांचं दोघांवर देखील समान प्रेम असतं. एक वडील म्हणून आपल्या मुलांचे संगोपन करताना ते मुलाशी कायम कठोर भावनेने वागतात. याचा लहान वयात मुलांना फार राग येतो आणि वाईट वाटतं. मात्र जेव्हा मुलगा मोठा होतो तेव्हा त्याला आपल्या वडिलांनी आपल्यासाठी घेतलेले सर्व कष्ट आठवतात. वडिलांच्या कठोर भावनेमागे असलेले अश्रू आणि काळजी मुलाला तो स्वत: जेव्हा मोठा होतो तेव्हा समजते.

आता तुम्ही देखील मोठे झाले आहात. तुमच्या घरची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आली आहे. असे असल्यास वडिलांबद्दल तुमच्या मनातील भावना त्यांना आवर्जून सांगा. त्यामुळे तुमचे मन हलके होईल. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वडील महत्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांचे आभार शब्दांत व्यक्त करणे खरंच कठीण आहे. मात्र या ५ गोष्टी वडिलांचे निधन होण्याआधी प्रत्येक मुलाने त्यांना सांगितल्याच पाहिजेत.

तुम्ही माझे गुरू आहात

प्रत्येक वडील आपल्याला जे काही सुख मिळाले नाही ते आपल्या मुलांना आपण मिळवून देऊ अशी भावना ठेवतात. त्यामुळे त्यांचे निधन होण्याआधी तुम्ही यासाठी वडिलांना ते तुमच्या आयुष्यातील पहिले आणि मोठे गुरु आहेत असं सांगा. हे ऐकून तुमच्या वडिलांच्या डोळ्यात लगेचच अश्रू दाटतील.

सध्या असलेल्या परिस्थितीसाठी स्वत:ला जबाबदार ठरवू नका

तुम्ही आजवर माझ्यासाठी खुप काही केले. मात्र आजही मी तुम्हाला हवं तसं करू शकलो नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या संगोपनात किंवा शिक्षणात काही कमी केली, असा विचार करू नका. आपल्या परिस्थितीनुसार तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही कामे केली आहेत.

मला तुमचा अभिमान वाटतो

अनेक अडचणी आणि खडतर मार्ग असूनही तुम्ही त्याची झळ माझ्यापर्यंत कधीच पोहचू दिली नाही. मला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी तुम्ही मला पुरवल्यात. त्यासाठी मला तुमचा अभिमान वाटतो. मला कायम मी तुमच्यासारखं व्हावं असं वाटतं.

सर्व कामे मी संभाळेल तुम्ही आराम करा

आता तुमचं वय झालं आहे. या वयात तुम्ही जवळ असलेल्या सर्व कामांची जबाबदारी माझ्यावर द्या. मी तुम्ही दिलेली जबाबदारी निट पार पाडेल. तसेच इथून पुढचे जीवन तुम्ही आरामात घालवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकर बिझनेसमन होणार विराट कोहलीच्या RCBचा मालक, तब्बल १७५५३ कोटींच्या डीलची चर्चा

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shocking: शाळेतील बोर्ड मिटिंगमध्ये अचानक कपडे काढू लागली महिला, अधिकारी पाहतच राहिले; VIDEO व्हायरल

Mira-Road : धक्कादायक! मिरा रोडमध्ये गरब्यात फेकली अंडी, तणाव वाढला | VIDEO

Idli Chutney Recipe: इडलीची चटणी खूप पातळं होतेय? मग ही खास स्टेप एकदा नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT