How To Find FASTag Deduction Details Saam Tv
लाईफस्टाईल

FASTag मधून चुकून पैसे कट झाले? कसे मिळवाल Return, फॉलो करा ही प्रोसेस

कोमल दामुद्रे

FASTg Money Deducted Without Travel :

नॅशनल हायवेने सर्व वाहतुकींसाठी फास्टॅग सेवा सुरु केली आहे. ही सेवा १ डिसेंबर २०१९ पासून सुरु केली आहे. या सेवेनुसार जर कोणत्याही वाहन चालकाकडे फास्टॅग नसेल त्याला टोल दुप्पट भरावा लागू शकतो.

FASTag मध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID)तंत्रज्ञान वापरले जाते. मात्र, अलीकडच्या काळात टोल टॅक्सबाबत (Tax) अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.

बरेचदा आपली कार (Car) किंवा इतर वाहाने १७५ किलोमीटर दूर उभी असतानाही FASTag मधून त्यांचे पैसे कापले जातात. मग अशावेळी कट झालेले पैसे आपल्याला परत कसे मिळतील. तक्रार कशी कराल? जाणून घेऊया याबाबत सविस्तर

1. FASTag ची तक्रार कुठे कराल?

FASTag विषयीची तक्रार दोन प्रकारे करता येते. NHAI च्या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १०३३ वर तक्रार नोंदवू शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील अधिकारी आणि कार्यालयांकडे तक्रार करु शकता. NHAI वेबसाइट्नुसार तक्रारीची तपासणी करावी लागते. चुकीच्या पद्धतीने कापलेले पैसे २० ते ३० दिवसांच्या आत ग्राहकांना परत केले जातात.

2. पैसे परत कसे मिळतील?

ग्राहक फास्टॅग जारी करणाऱ्या बँकेच्या हेल्पलाइन क्रमांकावरही तक्रार नोंदवू शकतात. बऱ्याच बँका FASTag शी जोडल्या जातात. त्यासाठी ग्राहकांना बँकांच्या हेल्पलाइन क्रमांकाशी कनेक्ट होऊ शकतात. त्यासाठी NPCI च्या वेबसाइटवर क्लिक करुन हेल्पलाइन नंबर जाणून घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. फास्टॅग पेटीएमशी लिंक असेल तर तुम्ही तक्रार करु शकता. तसेच १८००-१२०-४२१० या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करावा लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT