काय सांगता! तुमचा Smartphone, TV आणि Speaker चोरुन गोष्टी ऐकतो? धक्कादायक अहवाल समोर

Is my phone listening to me : तुमचा स्मार्टफोन, टीव्ही आणि स्पीकर तुमचे बोलणे चोरुन ऐकतोय? अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. असे म्हटले जाते की, स्मार्ट उपकरणे आपले ऐकतात. याबाबतची माहिती कॉक्स मीडिया ग्रुपच्या अहवलाने दिली आहे.
Is my phone listening to me
Is my phone listening to meSaam Tv
Published On

Smartphone Tv Speaker Can Listen Private Talk

तुमचा स्मार्टफोन, टीव्ही आणि स्पीकर तुमचे बोलणे चोरुन ऐकतोय? अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. असे म्हटले जाते की, स्मार्ट उपकरणे आपले ऐकतात. याबाबतची माहिती कॉक्स मीडिया ग्रुपच्या अहवलाने दिली आहे.

रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, गॅजेट्स आपल्या पर्सनल गोष्टी ऐकतात. हे स्मार्ट टीव्ही (TV), स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टी आपले बोलणे चोरुन ऐकतात. त्यामुळे आपल्या डोक्यात सुरु असलेल्या बऱ्याच गोष्टी जाहिराती मार्फत दिसतात. स्मार्टफोनचा (Smartphone) AI त्याचप्रकारे काम करतो.

1. अहवालातून धक्कादायक खुलासा

या सगळ्या गोष्टी जाहिरातीसाठी वापरल्या जातात. ४०४ मीडियाने आपल्या अहवालात ही सर्व माहिती देण्यात आली आहे. याआधी देखील याबाबतची माहिती समोर आली आहे. स्मार्टफोन, स्पीकर आणि इतर स्मार्ट गॅजेट्स आपलं बोलणं चोरून ऐकतात. असे प्रश्न यापूर्वी देखील अनेकदा उपस्थित झाले आहेत.

Is my phone listening to me
विना हँडल, सेल्फ बॅलेन्स, युनिक डिझाईन... मालकाच्या इशाऱ्यावर चालणारी Yamaha ची जबरदस्त बाईक

तुम्ही ज्या गोष्टींबद्दल कोणत्याही व्यक्तीशी बोलत असाल तर त्याच संबंधित जाहिरात आपल्याला पुन्हा पाहायला मिळतात. परंतु, याबाबत कंपनीने (Company) स्पष्टपणे मान्य केले नाही.

2. कंपन्या खरंच ऐकतात का?

स्मार्टफोनवरील कोणतेही अॅप मायक्रोफोनची परवानगी घेत असेल, तर ते तुमचा आवाज ऐकत असल्याची शक्यता आहे. अनेक वेळा कंपन्या जाहिरातींसाठी लोकांचे बोलणे ऐकतात. यासाठी तुम्हाला Android किंवा Iphone च्या अॅप सेटिंग्जवर जावे लागेल. अॅप्सची सूची दिसल्यानंतर टॅप करुन तुम्ही कोणत्या अॅप्सने तुमच्या फोनच्या किती परवानग्या घेतल्या आहेत हे तपासू शकाल. अनेक अॅप्सना तुमच्या मायक्रोफोन आणि कॅमेरामध्ये कोणत्याही कारणाशिवाय प्रवेश मिळतो. ज्यामुळे आपला वैयक्तिक डेटा हॅक होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी तुम्ही कोणत्या अॅप्सना काय परवानगी देताय हे देखील तपासणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com