Famous Temple In Dombivli SAAM TV
लाईफस्टाईल

Famous Temple In Dombivli : भक्तीत दंग व्हा अन् मनःशांती मिळवा, डोंबिवलीतील 'या' प्रसिद्ध मंदिरांना भेट द्याच

Dombivli : डोंबिवलीतील 'या' प्रसिद्ध मंदिरांना आवर्जून भेट द्या आणि भक्तीत तल्लीन व्हा.

Shreya Maskar

मुंबईच्या मध्य रेल्वेला डोंबिवली स्थानक येते. दिवा व कल्याण यांच्यामध्ये डोंबिवली स्टेशन आहे. डोंबिवलीला (Dombivli ) संस्कृती आणि मराठी भाषेचं माहेरघर म्हटलं जातं. कमी पैशांत डोंबिवली तुम्हाला चांगल्या सुविधा असलेले हक्काचे घर घेता येते. डोंबिवलीत देखील विविध पर्यटनाची ठिकाणे आहेत. मात्र आज आपण येथील देवस्थानांची ओळख करून घेऊयात.

गणेश मंदिर

गणेश मंदिर हे डोंबिवलीतील लोकांचे श्रद्धास्थान आहे. हे डोंबिवलीचे ग्रामदैवत आहे. या मंदिराला 96 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1915 च्या सुमारास डोंबिवलीतील स्थानिक रहिवाशांनी हे मंदिर उभारले आहे. नवीन वसाहत असल्यामुळे आपल्या राहण्याच्या जागेजवळ एखादे मंदिर असावे अशी रहिवाशांची सर्वसाधारण भावना होती त्यातूनच या मंदिराची कल्पना साकारण्यात आली. गणपती, भगवान शंकर - पार्वती , मारुती आणि महालक्ष्मी या देवतांच्या मुर्त्या तुम्हाला येथे पाहायला मिळतील.

पिंपळेश्वर मंदिर

डोंबिवली जवळील सागाव गावात पिंपळेश्वर मंदिर वसलेले आहे. हे मंदिर 150 वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. 2001 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेत बाग आहे. येथे विविध प्रकारची फुले, झाडे पाहायला मिळतात.

श्री गावदेवी मंदिर

श्री गावदेवी मंदिर हे डोंबिवलीतील सर्वात जुने मंदिर आहे. येथे तुम्हाला शांती मिळेल. येथे नवरात्री उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. येथे स्थानिक लोकांसोबत इतर अनेक भक्त ही आवर्जून येतात.

पोन्नू गुरुवायुरप्पन मंदिर

पोन्नू गुरुवायुरप्पन मंदिर हे गुरुवायुरप्पन यांना समर्पित आहे. हे मंदिर दक्षिण भारतीय केरळच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. हे मंदिर डोंबिवलीत वसलेले आहे. भाविक आध्यात्मिक शांतीसाठी या मंदिरात येतात. या मंदिरात अनेक सार्वजनिक उपक्रम राबवले जातात. डोंबिवलीत इतर अनेकही मंदिरे आहेत. उदा. खिडकाळेश्वर मंदिर, मयुरेश्वर मंदिर,आयप्पा मंदिर,शिवमंदिर, स्वामी समर्थ मंदिर, बालाजी मंदिर इत्यादी या सर्व मंदिरांमध्ये भक्तांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

SCROLL FOR NEXT