Family Planning Saam Digital
लाईफस्टाईल

Family Planning : उशिराने मूल जन्माला घालताय, सावधान! तुमचं लेट प्लानिंग मुलांना करेल उद्ध्वस्त?

Mayuresh Kadav

मयुरेश कडव, साम टीव्ही प्रतिनिधी

आता सर्वांना सावध करणारी बातमी..तुम्ही जर लग्नानंतर मूल उशिरानं जन्माला घालण्याचं प्लॅनिंग करत असाल तर तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. इतकच नाही तर जन्माला येणाऱ्या मुलावरही त्याचे वाईट परिणाम दिसू शकतात. सोशल मीडियात याबाबत एक मेसेज व्हायरल होतोय. साम टीव्हीनं या दाव्याची पडताळणी केली. तेव्हा कोणतं धक्कादायक वास्तव समोर आलं पाहा...

बदलत्या जीवनशैलीनुसार लग्न आणि मूल जन्माला घालण्याच्या संकल्पनाही बदलल्या आहेत. अलिकडे करिअरच्या नादात लग्न उशिराने होतं. त्यातही मूल जन्माला घालण्यासाठी प्लॅनिंग केलं जातं. मात्र हेच उशिराचं प्लॅनिंग तुमच्या मुलांच्या जिवावरही बेतू शकतं. याबाबत सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हंटलंय पाहा...

तुम्ही जर मूल उशिराने जन्माला घालत असाल तर मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या मुलांमध्ये शाररिक तसच मानसिक व्याधी असू शकतात. प्री मॅच्युअर बाळाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. वडिलांचं वय जास्त असेल तर मुलांना कॅन्सरचा धोका होऊ शकतो. प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत असा हा विषय आहे. करिअर आणि इतर गोष्टींमुळे तरूण-तरूणी लग्न आणि मूल या बाबींकडे फारसं लक्ष देत नाहीत. त्यामुळे साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. या दाव्यासंदर्भात तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेतली. तेव्हा त्यांनी काय सांगितलं पाहा.

स्त्री आणि पुरूष दोघांमध्ये वाढत्या वयानुसार शाररिक आणि मानसिक बदल होतात. स्त्रियांमध्ये 35 वायनंतर स्त्रीबीजाचं प्रमाण कमी होतं. तर पुरूषांमध्ये चाळिशी ओलांडल्यानंतर शुक्राणूंची संख्या घटते. आई-वडिलांधील जेनेटिक परिणाम बाळामध्ये येतात. योग्य वयात मूल जन्माला न घातल्यास प्री मॅच्युअर डिलिव्हरीची शक्यता अधिक असते. अमेरिकेतील स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीनं यावर संशोधन करून अहवाल सादर केलंय. त्यानुसार अशा मुलांना ब्रेन, ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका असतो. स्क्रिजोफ्रेनियासारखा आजारही होऊ शकतो.

त्यामुळे आमच्या पडताळणीत उशिरा मूल जन्माला घातल्यानं मुलाच्या आरोग्याला धोका असल्याचा दावा सत्य ठरलाय. करिअरच्या नादात लग्न आणि मूलांकडे दुर्लक्ष करू नका. वाढत्या वयात मूल जन्माला घालण्याचा तुमचा निर्णय मुलांसाठी धोक्याचा ठरू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election commission PC : राज्यात कधी जाहीर होणार निवडणूक, महिला - नवमतदारांची संख्या किती? निवडणूक आयुक्तांच्या PC चे महत्त्वाचे मुद्दे

Plastic Rice : तुम्ही खाताय प्लास्टिकचा तांदूळ? काँग्रेस खासदारांच्या दाव्याने खळबळ, तथ्य काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Senate Election : मुलाचं कौतुक, आईला अप्रुप; सिनेटचा विजयानंतर मातोश्रीवर भावनेचा पूर, पाहा व्हिडिओ

Ajit Pawar: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नवं चिन्ह मिळणार? 1 ऑक्टोबरला 'घड्याळ'चा फैसला?

Maharashtra Politics : दिघेंच्या मृत्यूवरुन पुन्हा रंगलं राजकारण; शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ, नेमका काय केला आरोप? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT