Ganesh Chaturthi 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवात तेजस्वी होईल चेहरा; घरच्याघरी ट्राय करा 'हे' फेसपॅक

Ruchika Jadhav

राज्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी सर्वत्र गणरायाची मनोभावे सेवा करतात. प्रत्येक भक्त बाप्पाच्या सेवेत तल्लीन होतो. काही व्यक्ती आपल्या घरी दीड दिवसांचे गणपती बसवतात तर काही व्यक्ती 5 तर काही ठिकाणी 10 दिवसांसाठी घरी बाप्पा विराजमान होतो. या दिवसांत घरी गौराई सुद्धा येतात. या सर्व सोहळ्यात प्रत्येक मुलीला सुंदर आणि कुल दिसायचं असतं.

घरी गणपती बाप्पा असल्याने सतत पाहुणे आणि भरपूर कामं करावी लागतात. यामध्ये सर्वच मुली अगदी थकून जातात. प्रसाद बनवण्यासाठी पहाटे 4 वाजता उठावे लागते. या सर्वांमुळे चेहऱ्यावर थकवा येतो. तसेच काहीवेळा चेहरा अगदी डल दिसू लागतो. त्यात चेहऱ्यावर पिंपल्स आले की सगळा मुड जातो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी गणेशोत्सवात ग्लोइंग स्किनसाठी काय केले पाहिजे याची माहिती सांगणार आहोत.

हळद आणि दुधाचा फेसपॅक

सर्वात आधी एका वाटीत चमचाभर हळद घ्या. त्यानंतर यामध्ये 1 चमचा दूध आणि थोडी दुधावरील मलई मिक्स करा. हा फेसपॅक रात्री झोपताना चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. पहिल्या दिवशी हा फेसपॅक तुम्ही ट्राय करू शकता.

बदाम फेसपॅक

स्किन सॉफ्ट आणि क्रिमी व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी चार बदाम घ्या. त्यानंतर एक साधा दगड घेऊन यावर दोन चार दुधाचे थेंब घ्या आणि बदाम यावर उगाळून घ्या. एक एक करून सर्व बदाम उगळून घ्या. पुढे ही तयार पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावून घ्या. पेस्ट चेहऱ्यावर लावल्यावर ती पूर्ण सुकू द्या. त्यानंत चेहरा धुवून घ्या.

आळशी आणि तांदूळ

तुम्ही स्किन आणखी सुंदर दिसावी यासाठी आळशीच्या बियांचा देखील वापर करू शकता. त्यासाठी सर्वात आधी या बिया आणि थोडे तांदूळ मिक्सरला मस्त बारीक करून घ्या. सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करताना अगदी त्याची पावडर बनवू नका.

चेहऱ्यावर लावताना या मिश्रणात एक चमचा तांदळाचे पीठ मिक्स करा. त्यानंतर पाणी मिक्स करून याची घट्ट पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. तसेच चेहरा सुकत आपल्यावर पाण्याच्या हाताने चेहरा स्क्रब करा. या सिंपल टिप्सने तुमची स्किन अगदी मोत्यासारखी चमकेल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT