Meta Rollout Subscription Price, Cost of Meta subscription Saam Tv
लाईफस्टाईल

Facebook-Instagram वापरण्यासाठी युजर्सला मोजावे लागणार पैसे, मेटाचा नवा निर्णय

Cost of Meta subscription : प्रवासात किंवा फावल्या वेळेत आपण सोशल मीडियाचा अधिक वापर करतो. फेसबुक आणि इंस्टासारख्या साइट्सवर रिल्स किंवा व्हिडिओ पाहातो. परंतु, मेटा याबाबत युजर्सला जबरदस्त झटका दिला आहे.

कोमल दामुद्रे

Facebook -Instagram News :

प्रवासात किंवा फावल्या वेळेत आपण सोशल मीडियाचा अधिक वापर करतो. फेसबुक आणि इंस्टासारख्या साइट्सवर रिल्स किंवा व्हिडिओ पाहातो. परंतु, मेटा याबाबत युजर्सला जबरदस्त झटका दिला आहे.

मेटा (Meta) प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहे. हा नियम सध्या युरोपमधील काही देशांमध्ये लागू करण्यात आला आहे. तुम्हाला अॅड फ्री फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम वापरण्यासाठी पैसे भरावे लागणार आहे. याबाबतीत मेटाने काही महिन्यांपूर्वी निर्णय घेतला आहे. कंपनीने (Company) सबस्क्रिप्शन आणला आहे. यासंदर्भातील माहिती मेटाने दिली आहे. आता याबाबतची माहिती समोर आली आहे.

कंपनीने सबस्क्रिप्शन मॉडेलचे शुल्क कमी केले आहे. फेसबुकसाठी शुल्क कमी करुन EUR ५.९९ (सुमारे ५४० रुपये)करण्यात आले आहे. तर इंस्टाग्रामची शुल्क ही EUR ९.९९ (सुमारे ९०० रुपये)करण्यात आली आहे. कंपनीने प्रायव्हसीला लक्षात ठेवून हा निर्णय घेतला आहे. युरोपमधील गोपनीयतांकडून आणि ग्राहकांकडून विरोध केला जात होता.

मिळालेल्या माहितीनुसार मेटा आपल्या ग्राहकांचा डेटा वापरते अशी माहिती मिळाली आहे. परंतु, युरोपियन नियमांच्या नवीन कायद्यानुसार मेटाने डेटा ऍक्सेस करण्यास सक्षम नसल्यामुळे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. हे शुल्क १८ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या युजर्सकडून वसूल करण्यात येणार आहे.

युरोपियन युनियन आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांसाठी मेटा पैसे आकारणार आहे. १ नोव्हेंबरपासून सुरुवातीला 9.99 युरो (सुमारे 880 रुपये)प्रति महिना मोजावे लागले होते. तसेच iOS आणि Android वापरकर्त्यांना 12.99 युरो (सुमारे 1,100 रुपये)भरावे लागले. परंतु, आता याचे शुल्क आता कमी करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT