Know How constipation leads to acne and skin problems: आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्किनकेअरसाठी पुरेसा वेळ काढता येत नाही. शिवाय बाहेरच्या हवेतील प्रदूषण, धूळ, ऊन यामुळे त्वचा तेलकट होते. पावसाळ्यात तर या समस्या आणखी जास्त वाढतात. यामूळे चेहऱ्यावर अॅलर्जी होऊन खाज, पूरळ आणि डाग येतात. म्हणूनच त्वचेची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. काहीजण अगदी न चुकता स्किनकेअर करतात, महागडे प्रोडक्ट्स वापरतात, पार्लरमध्ये प्रचंड पैसे मोजतात. तरी सुद्धा त्यांना पिम्पल्सच्या समस्यांना सामोरे जावे लागते. एक्सपर्ट्सच्या मते याचे कारण तुमचे साफ न झालेले पोट असू शकते.
Experts Sya's Over Pimples and Poor Digestion:
काय म्हणतात एक्सपर्ट्स :
पोट साफ न होण्याच्या समस्येला बद्धकोष्ठता असे म्हणतात. अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार, गॅस्ट्रोएन्टरोलॉजी आणि जनरल सर्जरी डॉ.साद अनवर यांच्या मते बद्धकोष्ठता ही फक्त पोटाची समस्या नाही, तर याचा परिणाम त्वचेवर ही होऊ शकतो. नियनित पोट साफ न झाल्याने शरीरात टॉक्सिन्स जमा व्हायला सुरूवात होते. हे टॉक्सिन्स रक्तात मिसळून त्वचेपर्यंत पोहोचतात. यामुळे त्वचेवर दाणे , मुरूमं, ड्रायनेस, खाज येते तसेच त्वचेला एक काळपटपणा येतो.
बद्धकोष्ठतेमुळे योग्य प्रकारे पचन न झाल्याने शरीराला पुरक नसणारे घटक बाहेर पडत नाहीत. शरीरात त्यांचे प्रमाण हळूहळू वाढू लागते, आणि ते त्वचेला हानी पोहोचवू शकतात. यामुळे चेहऱ्यावर पिम्पल्स, खाज किंवा त्वचेवर रॅशेस आणि इतर समस्या उद्भवतात. तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर, तासन् तास वेळ काढून, महागडे प्रोडक्ट्स वापरून केलेल्या स्किन केअरचा काहीही उपयोग होत नाही. यासाठी तुम्ही तुमच्या डायटची काळजी घेणे आणि त्यात बदल करणे आवश्यक आहे.
बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी काय करावे ?
कमी फायबर असलेले जेवण, शरीरात पाण्याची कमतरता, दुग्धजन्य पदार्थांचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव, आतड्यांची समस्या - या सगळ्या कारणांमुळे बद्धकोष्ठता होते. यावर उपाय म्हणून खालील टिप्स फॉलो करा.
१. दिवसातून ८-१० ग्लास पाणी प्या.
२. फळे, भाज्या, धान्ये असा भरपूर फायबर असलेला आहार घ्या.
३. नियमित व्यायाम करा.
४. योग, ध्यान किंवा इतर तणाव कमी करणारे तंत्र शिका.
५. रात्री झोपण्याआधी गरम पाण्यातून त्रिफळा चूर्ण घ्या.
टीप: वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.