Eye Care Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Eye Care Tips : सावधान ! पुन्हा आली आहे डोळ्यांची साथ, लगेच 'हे' करा

वडिलधाऱ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत आणि अगदी म्हातारेही आपला जास्तीत जास्त वेळ फोनसोबत घालवतात.

कोमल दामुद्रे

Eye Care Tips : वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारांरीचा सामना करावा लागतो. यात सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते ती त्वचेच्या भागांची. त्यातील महत्त्वाचे डोळे.

वडिलधाऱ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत आणि अगदी म्हातारेही आपला जास्तीत जास्त वेळ फोनसोबत घालवतात. जे शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टया हानिकारक ठरत आहे. (Latest Marathi News)

लठ्ठपणा, आळस, तणाव, नैराश्य अशा अनेक आजारांना व्यक्ती बळी पडत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की फोनची स्क्रीन आपल्या दृष्टीलाही हानी पोहोचवू शकते? सर्वाधिक स्मार्टफोन असलेल्या पहिल्या तीन देशांपैकी भारत देखील एक आहे.

सध्या ऑक्टोबर हिटचा आपल्या त्वचेसोबत डोळ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतोय. त्यामुळे डोळे येण्याची साथ पसरली आहे. याचा लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत प्रत्येकाला त्याचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस वाढत चालेल्या या संक्रमणामुळे घराबाहेर पडू नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. (Eye Care Tips)

लक्षणे (Symptoms of Eye conjunctivitis)

- सुरुवातीला डोळ्यांमध्ये काही तरी गेल्यासारखे वाटते किंवा सतत काही तरी टोचत राहाते. डोळे लाल होतात, त्यातून सतत पाणी निघते किंवा खाज लागते.

- सतत डोळ्यांची (Eye) आग होणे.

- रात्रीच्या वेळी एक किंवा दोन्ही डोळ्यांमधून एक कवच तयार होतो ज्यामुळे तुमचा डोळा किंवा डोळे सकाळी उघडण्यापासून रोखू शकतात

- हा संसर्गजन्य आजार (Disease) एक ते दोन आठवडे टिकून राहातो. शक्यतो या दिवसात धूळ व प्रदूषणापासून दूर राहावे

उपाय - (Solution)

- डोळे सतत जळजळत असतील किंवा आग होत असेल तर डोळ्यांवर पाणी मारा किंवा बर्फाने शेक घ्या

- डॉक्टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉप घाला.

- डोळ्यांवर ओल्या पाण्याच्या पट्टया ठेवा ज्यामुळे त्यांची जळजळ कमी होईल.

- या दिवसात शक्यतो स्क्रिन टाइमचा वापर कमी करा.

- घराबाहेर निघत असाल तर चश्म्याचा वापर करा.

- तेलकट पदार्थ खाऊ नका आणि कोणतेही घरगुती क्लिनर वापरू नका.

- घरगुती उपायांचा अवलंब न करता वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

Tharवाल्याचा विकृतपणा! आधी कट मारला, नंतर रिव्हर्स घेत वृद्धाच्या अंगावर घातली भरधाव कार|Video Viral

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT