Retina Care Tips : वाढत्या वयात डोळ्यातील रेटिनाकडे वेळीच लक्ष द्या, अन्यथा...

मुलांच्या व वयोवृध्दांच्या डोळ्यांकडे वेळीच लक्ष द्यायला हवे, नाहीतर रेटिनाला होऊ शकतो त्रास
Retina Care Tips
Retina Care TipsSaam Tv

Retina Care Tips : आपल्यापैकी बरेच लोक हे डोळ्यांच्या बाबतील निष्काळजीपणा करतात. हल्ली लहान मुलांपासून ते वयोवृध्दांपर्यंत प्रत्येकजण हा सतत डोळ्यांना त्रास होईल अशा उपकराणांवर दिवसभर असतो.

हल्ली डोळ्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. डोळ्यांच्या रेटिनाकडे अद्यापह बरेच लोक दुर्लक्ष करतात. त्यामुळे डोळे दुखणे, डोळ्यातून सतत पाणी येणे किंवा डोळ्यात सतत काही तरी टोचतयं यासारखी लक्षणे दिसू लागतात.

Retina Care Tips
तुमची नजर कमकुवत आहे ? तुम्हाला देखील मधुमेहाचा त्रास आहे ? तर होऊ शकतो हा आजार

रेटिनाच्या काही कालपरत्वे गंभीर होत जाणाऱ्या आजारांचे परिणाम अगदी कमी वयापासूनच दिसू लागतात मात्र त्याबाबत जागरुकता नसल्याने लक्षणे गंभीर दिसू झाल्यावरच त्यांच्याकडे लक्ष दिले जाते.

एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन (एएमडी) आणि डायबेटिक रेटिनोपॅथी (डीआर) यांसारख्या आजारांचे योग्य वेळी अचूक व्यवस्थापन केले गेले नाही तर दृष्टी बऱ्यापैकी अधू होऊ शकते किंवा गमवावी लागू शकते. एएमडीमुळे मध्यवर्ती दृष्टीवर परिणाम होतो. सध्या हा आजार वयोवृद्ध व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतोय परंतु, मुलांच्या डोळ्यांकडे लक्ष दिले नाही तर त्यांना देखील या आजाराची लक्षणे कमी वयातच दिसू लागतील. डीआरमुळे मधुमेहींच्या रेटिनातील रक्तवाहिन्यांना इजा होते व त्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते किंवा नजर कमकुवत होऊ शकते.

मुंबई रेटिना सेंटरचे सीईओ विट्रेओरेटिनल सर्जन डॉ. अजय दुदानी म्‍हणाले,भारतात सामान्‍य डोळ्यांच्‍या आजारांच्‍या वाढत्‍या प्रमाणामुळे प्रतिबंधात्मक अंधत्‍व व दृष्टीदोषामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच जीवनशैलीमधील बदल डीआर व एएमडीच्‍या प्रतिबंधामध्‍ये प्रमुख भूमिका बजावतात.

Retina Care Tips
Eye care tips : कम्प्युटर व स्मार्टफोनच्या स्क्रीनचा डोळ्यांवर परिणाम कसा होतो? डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

मधुमेहावर (Diabetes) नियंत्रण ठेवणे, लिपिड व कोलेस्‍ट्रॉल पातळ्या योग्‍य राखणे आणि लठ्ठपणा सारख्‍या इतर कोमोर्बिड आजारांचा उपचार करणे हे डीआरसाठी महत्त्वपूर्ण प्रतिबंधात्‍मक आरोग्‍यदायी उपाय आहेत. एएमडीसाठी यूव्‍ही किरणे टाळणे किंवा थेट सूर्यप्रकाशात न जाणे, रक्‍तदाबावर नियंत्रण आणि धूम्रपान बंद करणे हे अनिवार्य आहे. ल्युटीन संपन्‍न आहार – अंड्यातील पिवळे बलक, हिरव्या पालेभाज्या, मका, लाल बिया नसलेली द्राक्षे हे एएमडी विकसित होण्‍याला प्रतिबंध करण्‍यासाठी उत्तम पौष्टिक सप्‍लीमेंट्स आहेत.

रेटिनाच्या आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

दृष्टी अधू होणे हा काही म्हातारपणाचा अटळ परिणाम नव्हे आणि या स्थितीची चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करणे शक्य आहे. जुनाट आजारांमुळे रेटिनाचे आरोग्य ढासळण्याच्या बाबतीतही हेच सांगता येईल. चांगला आहार, निरोगी जीवनशैली आणि वेळोवेळी करून घेतलील नेत्रतपासणी यांच्या मदतीने रेटिनाची हानी टाळता येते. त्यासाठीच्या काही उपाययोजना तुम्ही जरूर करून पाहू शकता.

१. तुमच्या डोळ्यांना (Eye) कोणत्या आजारांचा त्रास होऊ शकतो व त्यांना कसे रोखायचे याविषयी जागरुक रहा. तुम्हाला एखादा जुनाट आजार असेल तर त्यामुळे तुमच्या रेटिनावर परिणाम होऊ शकतो का याविषयी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा.

२. रेटिनाचे आरोग्य जपण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ऑप्टोमीटरिस्ट किंवा ऑप्थॅल्मोलॉजिस्टकडून नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून घेणे. यामुळे आजाराला प्रतिबंध करता येतो किंवा एखाद्या स्थितीचे सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान होते. यामुळे ती स्थिती अधिक चांगल्या प्रकारे सांभाळण्यास मदत होते आणि दृष्टी गमावणे रोखता येते.

३. तुमच्या डोळ्यांची आर्द्रता टिकविण्यासाठी ड्रॉप्सची गरज आहे किंवा नाही, किंवा प्रगत टप्प्यावर पोहोचलेल्या एएमडीसाठी लेझर थेरपीची गरज आहे किंवा नाही हे केवळ विशेषतज्ज्ञ ठरवू शकतात. तेव्हा तुमच्यासाठी कोणती उपचारपद्धती योग्य आहे हे डॉक्टरांना ठरवू द्या.

Retina Care Tips
Uses of sleeping eye mask : स्लिपिंग आय मास्क लावून झोपल्यास डोळ्यांचा प्रकाशापासून होईल बचाव

४. रक्तदाब आणि कॉलेस्ट्रॉलवर नियमितपणे देखरेख ठेवणे हे हृदय आणि डोळ्यांसह इतर इंद्रियांची हानी रोखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मधुमेहींच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्यास त्याची परिणिती DR मध्ये होऊ शकते.

५. अमेरिकन ऑप्टोमेट्रिक असोसिएशनने (American Optometric Association) डोळ्यांच्या आरोग्यासाठी आपल्या आहारात काही विशिष्ट पोषक घटकांचा नियमितपणे समावेश करण्याचे सांगितले आहे. पालक, केळी आणि अंडी यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास दुर्धर नेत्रविकारांचा धोका कमी होऊ शकतो. बऱ्याच फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये आढळणाच्या क जीवनसत्वमुळे उतारवयात नजर अधू होण्याची प्रक्रिया मंदावू शकते. फ्लॅक्ससीड्स, चीया सीड्स, अक्रोड आणि मासे यांसारखे ओमेगा-३ फॅटी आम्लांचे उत्तम स्त्रोत असलेले पदार्थ हे मेंदूला दृश्य संदेश पाठविणाऱ्या रेटिनाचे कार्य चांगल्या प्रकारे सुरू राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com