Eye care tips, Eye care
Eye care tips, Eye care ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Eye care tips : काजोलसारखे हवे आहे डोळ्यांचे सौंदर्य, याप्रकारे करा त्याचे रक्षण

कोमल दामुद्रे

Eye care tips : नव्वदच्या काळात काजोलने अनेक सिनेमे केले. बॉलीवडूच्या त्या काळात तिच्या सौंदर्यामुळे तिचे चाहते देखील अनेक आहेत. अभिनयाच्या क्षेत्रात काजोलने तिच्या डोळ्यांचा हालचालीमुळे लाखो प्रेषकांची मने जिंकली.

हे देखील पहा -

आपल्या प्रत्येकाला असे वाटत असते की, आपल्याला आवडणाऱ्या अभिनेत्री सारखे डोळे आपले देखील असायला हवे. पंरतु, ते असणे शक्य नाही. एखादी अभिनेत्री तिच्या डोळ्यांवर वेळ (Time) आणि पैसा दोन्ही खर्च करू शकते, पण आपल्या तितके पैसे खर्च करायला जमत नाही. डोळ्यांचे सौंदर्य जपण्यासाठी आपण डोळ्यांना काही ब्युटी उत्पादनांचा वापर करतो पण त्यांचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो व होणाऱ्या समस्या गंभीर असतात अशावेळी आपण आपल्या डोळ्यांची काळजी कशाप्रकारे घेऊ शकतो हे जाणून घेऊया.

१. डोळ्यांचे सौंदर्य टिकवण्यासाठी आणि त्यांची खोली टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. किमान सात ते आठ तासांच्या झोपेने तुमचे डोळे चमकतील.

२. शिया बटरने मसाज केल्याने डोळ्यांचे सौंदर्य वाढते. केवळ डोळ्यांकडे लक्ष देणे पुरेसे नाही. डोळ्याभोवती देखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी डोळ्याभोवती शीया बटरने मसाज करा. हे पापण्यांवरही लावावे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-ई देखील पापण्या वाढण्यास मदत करतात, ज्यामुळे डोळे अधिक सुंदर दिसतात.

३. पेट्रोलियम जेलीने मसाज केल्याने डोळ्यांचे सौंदर्यही वाढते. डोळ्यांच्या पापण्यांवर अगदी हळूवारपणे लावा. लक्षात ठेवा की ते कोणत्याही परिस्थितीत डोळ्याच्या आत जाऊ नये. ही जेली तुम्ही पापण्यांवरही थोडीशी लावू शकता. त्यामुळे त्यांचा रंग उजळण्यासही मदत होऊ शकतो.

४. डोळ्यांना (Eye) आराम देण्यासाठी थंड पाणी हा सर्वात सोपा उपाय आहे. सतत डोळ्यांवर पाणी मारत रहा. यामुळे त्वचेवरील ताण कमी होऊ शकतो आणि डोळ्यांची आग कमी होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; चार मुलींची सुटका

Janhvi Kapoor: जान्हवीच्या फोटोशूटची चर्चा; गळ्यात कोणाच्या नावाचं नेकलेस?

Today's Marathi News Live : राहुल गांधी एक प्रवासी, देवेंद्र फडणवीस यांंचा खोटक टोला

Relationship Tips: 'या' मुलांच्या प्रेमात चुकूनही पडू नका; आयुष्य होईल उद्धस्त

MI vs KKR, IPL 2024: मुंबई की कोलकाता? कोण मारणार बाजी? पाहा दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT