Breathlessness While Climbing Stairs : जिना चढताना त्रास होतोय ? आजार आहे की, गंभीर समस्या ? जाणून घ्या अशावेळी काय करायला हवे

पायऱ्या चढताना अधिक श्वास घेण्यास सुरुवात होते, परंतु त्यांच्या काही सवयी बदलून ही समस्या टाळता येऊ शकते
Breathlessness While Climbing Stairs, Health tips
Breathlessness While Climbing Stairs, Health tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

Breathlessness While Climbing Stairs : बदलेली जीवनशैली व कामाच्या ताणामुळे आपल्यापैकी बरेच लोक हे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

हे देखील पहा -

सध्याच्या युगात अस्वास्थ्यकर अन्न आणि शारीरिक निष्क्रियतेमुळे लोक आतून कमजोर होताना दिसत आहे. यामुळेच लोक जिने चढण्याऐवजी लिफ्टचा वापर करण्यास प्राधान्य देतात, कारण दोन-चार पायऱ्या चढताच त्यांचा श्वास वाढू लागतो आणि हृदयाचे ठोकेही वाढतात. त्याचे नेमके कारण काय जाणून घेऊया

बरेचदा असे घडते की, दोन- चार पायऱ्या चढल्याबरोबरच आपल्याला दमायला होते, हे काही सामान्य लक्षण नाही, यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरात पोषक आणि उर्जेची कमतरता. अनेक वेळा शरीराची हालचाल करुन त्यावर ताण आल्यावरही आपण थकतो पण हे आपल्या अंतर्गत आजाराचे (Disease) लक्षण असू शकते. याचे कारण निद्रानाश, मानसिक आजार व अशक्तपणा असू शकतो ज्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो.

Breathlessness While Climbing Stairs, Health tips
White hair problem : सकाळी उठल्याबरोबर या पदार्थाचे सेवन करा, पांढऱ्या केसांपासून होईल सुटका

जिना चढताना दम लागत असेल तर हे उपाय करा -

- आपल्या स्वतःच्या शरीराचे वजन सामान्यपेक्षा जास्त होऊ देऊ नका.

- झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा.

- दररोज पूर्ण झोप घ्या आणि दिवसा झोपण्याची सवय टाळा.

- सकस आहार (Food) घ्या आणि फक्त पौष्टिक आहार घ्या.

- नियमित व्यायाम आणि व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.

समस्या कायम राहिल्यास काय कराल?

यानंतरही श्वासोच्छवासाचा त्रास कायम राहिल्यास त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हे क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमचेही लक्षण असू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com