Cancer Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Cancer Symptoms: अचानक वजन कमी होतंय? किती किलो वजन घटणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं? डॉक्टरांनी सांगितले महत्त्वाचे संकेत

Sudden weight loss: व्यायाम किंवा आहारात बदल न करता वजन कमी होत असेल, तर त्यामागचं कारण जाणून घ्या. अचानक वजन घटणं हे कॅन्सरसह इतर आजारांचं लक्षण असू शकतं. वजन किती कमी झाल्यास तपासणी करावी, इतर संकेत आणि आवश्यक वैद्यकीय चाचण्या समजून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

कोणताही व्यायाम न करता किंवा खाण्यापिण्याच्या सवयी न बदलता तुमचं वजन कमी होतंय का? सुरुवातीला अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. काही वेळा वजन कमी होण्यामागे साधी कारणं असू शकतात. मात्र कोणतंही ठोस कारण नसताना वजन कमी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, अचानक वजन कमी होणं हे कॅन्सरचं एक लक्षण असू शकतं. मग किती वजन कमी झाल्यास काळजी घ्यावी आणि कोणती लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडे जावं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

वजन कमी होणं आणि कॅन्सरचा काय संबंध?

आजतकला माहिती देताना मॅक्स हॉस्पिटलच्या कॅन्सर विभागातील डॉ. रोहित कपूर यांच्या मते, वेगाने वजन कमी होणं हे कॅन्सरचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. मात्र यामध्ये काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती नियमित व्यायाम करत असेल, आहारात बदल करत असेल किंवा वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर वजन कमी होणं स्वाभाविक असू शकतं. पण व्यायाम न करता, खाण्यापिण्यात कोणताही बदल न करता वजन कमी होत असेल तर त्यामागचं कारण शोधणं आवश्यक आहे.

तसंच मधुमेह किंवा शरीरातील चयापचयाच्या प्रक्रियेशी संबंधित दुसरा काही आजार नसतानाही वजन कमी होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा वेळी कॅन्सरसह इतर संभाव्य कारणांची तपासणी करणं गरजेचं असतं.

कॅन्सरमुळे वजन वेगाने का कमी होतं?

कॅन्सर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. त्याचा परिणाम भूक, शरीराची ऊर्जा आणि स्नायूंवर होऊ शकतो. त्यामुळे काही रुग्णांचं वजन वेगाने कमी होऊ लागतं.

शरीरात कॅलरी बर्न होतात

शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढू लागल्यावर त्या साइटोकाइन्स नावाची काही रसायनं सोडतात. या रसायनांमुळे शरीरातील चयापचयाची प्रक्रिया वेगवान होऊ शकते. परिणामी व्यक्ती आराम करत असतानाही शरीर नेहमीपेक्षा जास्त कॅलरी खर्च करू शकतं. त्यामुळे वजन कमी होऊ शकतं.

भूक कमी होते

शरीरातील या रसायनांच्या असंतुलनाचा परिणाम मेंदूतील भूक नियंत्रित करणाऱ्या भागांवरही होऊ शकतो. त्यामुळे रुग्णाला भूक कमी लागते. अन्न कमी खाल्लं गेल्याने वजन घटण्याची शक्यता वाढते.

स्नायू कमी होऊ लागतात

कॅन्सरच्या पेशींना वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज असते. या आजारामुळे शरीरातील स्नायू कमी होण्याची प्रक्रियाही सुरू होऊ शकते. स्नायू कमी झाल्यामुळे शरीराचं वजन घटतं. त्यामुळे काही रुग्णांचं वजन कमी होण्यासोबतच शरीरातील ताकदही कमी होऊ शकते.

किती वजन कमी झाल्यास कॅन्सरची शंका घ्यावी?

डॉ. रोहित कपूर यांच्या मते, ६ ते १२ महिन्यांच्या काळात कोणतंही ठोस कारण नसताना शरीराच्या एकूण वजनाच्या ५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त वजन कमी झाल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीचं वजन ६० किलो असेल आणि कोणताही विशेष प्रयत्न न करता सहा महिन्यांत ३ किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजन कमी झालं तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मात्र वजन कमी झालं म्हणजे कॅन्सरच झाला, असं नाही. इतरही अनेक आजारांमुळे वजन कमी होऊ शकतं. त्यामुळे नेमकं कारण शोधण्यासाठी वैद्यकीय तपासणी करणं महत्त्वाचं आहे.

वजन कमी होण्यासोबत ही लक्षणं दिसतायत का?

अचानक वजन कमी होण्यासोबत काही इतर लक्षणंही दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं.

  • शरीराच्या कोणत्याही भागात गाठ जाणवणं.

  • मानेत, काखेत किंवा शरीरातील इतर ठिकाणी लिम्फ नोड्स

  • सतत ताप येणं

  • रात्री झोपताना जास्त घाम येणं

  • शरीरात विनाकारण रक्ताची कमतरता निर्माण होणं

  • शौचातून रक्त जाणं

  • सतत खोकला येणं

  • शरीराच्या एखाद्या भागात दुखणं आणि ते बराच काळ कमी न होणं

ही लक्षणं दिसली म्हणजे कॅन्सर आहेच, असं नाही. मात्र त्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे.

वजन कमी होत असल्यास कोणत्या तपासण्या कराव्यात?

वजन कमी होण्यामागचं कारण शोधण्यासाठी कोणत्या तपासण्या करायच्या, हे रुग्णाची लक्षणं, वय आणि वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन डॉक्टर ठरवतात. काही सामान्य तपासण्यांचा यासाठी उपयोग होऊ शकतो.

  • CBC- रक्तातील हिमोग्लोबिन आणि रक्तपेशींची स्थिती तपासण्यासाठी

  • KFT- किडनीचं काम व्यवस्थित सुरू आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी

  • LFT- यकृताच्या कार्याची तपासणी करण्यासाठी

  • ESR/CRP- शरीरात दाह किंवा सूज असल्याचे संकेत आहेत का, हे तपासण्यासाठी

  • HbA1c- मागील साधारण दोन ते तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची स्थिती समजण्यासाठी

  • TSH- थायरॉईड ग्रंथीच्या कार्याची तपासणी करण्यासाठी

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज डी.लिट.ची मानद पदवी प्रदान होणार

Hair Care: ड्राय केस होतील मऊ आणि शायनी; पार्लरऐवजी घरीच तयार करा 'हा' हेअरपॅक

Home Remedies : घशातील चिकट कफ निघता निघत नाहीये? 'हे' ६ घरगुती उपाय करून पाहा

Health Tips : दुपारच्या जेवणानंतर लगेच झोप का येते? जाणून घ्या यामागची ६ सोपी कारणे

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा, आमदार सुनील शेळके आणि RTI कार्यकर्ते सुनील गुजर यांच्यात तुफान खडाजंगी

SCROLL FOR NEXT