Frequent urination cancer symptom men saam tv
लाईफस्टाईल

Cancer Risk In Men: सतत लघवी होतेय? साधी वाटणारी ही समस्या असू शकते कॅन्सरचं लक्षण; पुरुषांनी वेळीच सतर्क व्हा

Frequent urination cancer symptom men: वारंवार लघवी लागणं हा अनेकांना भासणारा त्रास आहे. सुरुवातीला हा साधा वाटतो पण तज्ज्ञांच्या मते हे लक्षण गंभीर आजारांचं संकेत असू शकतो. विशेषतः पुरुषांमध्ये हा त्रास प्रोस्टेट कॅन्सर किंवा मूत्राशयाशी संबंधित आजारांचं लक्षण असू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

पुरुषांना जर सतत लघवीला जाण्याचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अनेकजण याकडे वयानुसार दिसणारी समस्या म्हणून पाहतात. मात्र असं करणं धोकादायक ठरू शकतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सतत सतत लघवीला होणं हे प्रोस्टेट कॅन्सरचं लक्षण असू शकतं. खासकरून ५० वर्षांच्या व्यक्तींमध्ये हा त्रास अधिक होतो.

प्रोस्टेट कॅन्सरची सर्वात मोठी समस्या म्हणजे सुरुवातीला याची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. बऱ्याच प्रकरणांमध्ये हा कॅन्सर शरीरात हळू-हळू पसरत असतो. त्यामुळे थोडी जरी शंका आली तर तपासणी करणं गरजेचं आहे.

या समस्यांकडे लोकं करतात दुर्लक्ष

सतत लघवीला होणं, थांबून थांबून लघवी होणं, लघवी करताना किंवा बंद होताना त्रास होणं किंवा ब्लॅडर पूर्णपणे रिकामी न होणं य गोष्टी लोकं वाढत्या वयामुळे होतात असं मानून मोकळे होतोत. मात्र ही लक्षणं प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं असू शकतात. लघवीमध्ये रक्त दिसून येणं हा देखील एक गंभीर संकेत आहे. अशी परिस्थिती आल्यास त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये.

प्रोस्टेट वाढण्याची समस्या, युरीन इन्फेक्शन आणि प्रोस्टेट कॅन्सर यांची लक्षणं एका सारखीच दिसून येतात. यामध्ये फरक हाच आहे की, इन्फेक्शनमध्ये जळजळ, ताप, किंवा इतर समस्या दिसून येत नाही. मात्र कॅन्सरमध्ये लक्षणं बदलत जातात.यामध्ये काही संकेत असे असतात जे तुमच्या नजरेतून सुटतात आणि लक्षात येत नाहीत. जसं की, कंबरदुखी, हिप्समध्ये वेदना, कोणत्याही कारणाशिवाय थकवा येणं.

काय आहेत प्रोस्टेट कॅन्सरची कारणं?

प्रोस्टेट कॅन्सरची अचूक कारणं स्पष्ट झालेली नाहीत. मात्र वाढतं वय, जेनेटीक फॅक्टर, हार्मोनल बदल या गोष्टी मुख्य भूमिका बजावतात. लठ्ठपणा, धुम्रपान, जेनेटिक, दारूचं सेवन, खराब लाईफस्टाईल या गोष्टी याची जोखीम वाढवतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price : अचानक किंमती घसरल्या! चांदी ₹१७०००, सोनं ₹३००० ने स्वस्त; वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

Nashik : नाशिक हादरलं! पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपी कोण? नागपूर कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

SCROLL FOR NEXT