Liver Disease saam tv
लाईफस्टाईल

Liver Disease : दारुचे अतिसेवन ठरु शकते लिव्हरसाठी घातक, 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध !

दारूच्या सततच्या सेवनाने अनेकांचे लिव्हर खराब झाले असून त्यांना इतर प्रकारच्या समस्या देखील उद्भवलेल्या आहेत.

कोमल दामुद्रे

Liver Disease : लिव्हर हा शरीराचा सर्वात महत्वपूर्ण भाग आहे. परंतु बरेच लोक दारूचे सेवन जास्त प्रमाणात करतात. दारूच्या सततच्या सेवनाने अनेकांचे लिव्हर खराब झाले असून त्यांना इतर प्रकारच्या समस्या देखील उद्भवलेल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला दारूच्या सेवनाने लिव्हर कधी खराब होते आणि त्याचे कोणकोणते हे लक्षणे आहेत हे सांगणार आहोत.

दारूच्या सततच्या सेवनाने लिव्हर लवकर खराब होते. दारूमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. आपल्या शरीरामध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त झाले तर, लिव्हरमध्ये चरबी जमा होते. त्यामुळे पुढे जाऊन सोरायसिस, अल्कोहोल हेपेटाइटिस यासारखे समस्या उद्भवू लागतात.

याशिवाय अनियमित खानपान आणि बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव आपल्या लिव्हरवर होताना पाहायला मिळतो. त्यामुळे आपले लिव्हर लवकरात लवकर डॅमेज होते. असं पाहायला गेलं तर लिव्हरमध्ये स्वतःहून बरं होण्याची क्षमता असते. पण हे सगळं तेव्हाच होऊ शकत जेव्हा तुम्ही दारू किंवा अल्कोहोल सारख्या विशांच सेवन करत नसाल.

तुम्हाला तुमचे लिव्हर ठीक करायचे असेल तर, तुम्हाला अल्कोहोलयुक्त पदार्थांचे सेवन करायला पाहिजे. NHS च्या नुसार तुम्ही आठवड्यामधून 14 युनिट पेक्षा जास्त प्रमाणात दारूचे सेवन करत असेल तर तुमचे लिव्हर पूर्णपणे खराब होऊ शकते. त्याचबरोबर याचा तुमच्या आरोग्यावर (Health) देखील गंभीर परिणाम पाहायला मिळतो.

Liver Disease

पोटदुखी, थकवा, मतली, जुलाब, भूक न लागणे, कारण नसताना आजारी वाटणे.

हीच लक्षणे दिसताचं तुम्ही दारूचा सेवन करण्यास सोडले पाहिजे.

जर तुमचं लिव्हर खराब झाले असेल तर तुम्हाला डोळे (eye) सफेद होणे, त्वचा पिवळी पडणे, पायांना सूज येणे, पोटामध्ये सुजणे, ताप, त्वचेला खाज येणे, केस (Hair) गळणे, हातावरती लाल डाग पडणे, कमजोरी, रक्ताची उलटी, मल थांबणे, सतत नाक वाहने, वजन कमी होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या 12 वर्षांच्या सत्तेवर सोनिया गांधी संतापल्या; म्हणाल्या, देशाचं मोठं नुकसान झालं|VIDEO

Maharashtra News Live Update: दिवाळीच्या निमित्ताने कांदिवली पोलिसांना मोठे यश

Owl Significance : दिवाळीत घुबड दिसल्यास खरंच भरपूर पैसा मिळतो का? जाणून घ्या संकेत

Dewy Glass Skin Makeup: दिवाळीला चेहऱ्यावर शायनी नॅचरल ग्लो पाहिजे? मग तयारी करताना करा हा ड्यूई ग्लास स्किन मेकअप

High Cholesterol: या 2 मसल्यांचं पाणी रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल खेचून काढेल बाहेर; जाणून घ्या बनवण्याची पद्धत

SCROLL FOR NEXT