diabetes heart attack risk 
लाईफस्टाईल

Heart Attack: फिट दिसणाऱ्या तरुणांनाही हार्ट अटॅकचा धोका; डॉक्टरांचा नियमित तपासणीचा सल्ला

Young people heart attack risk: आजच्या काळात फिट दिसणाऱ्या तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढताना दिसत आहे. चुकीची जीवनशैली, तणाव, धूम्रपान, मद्यपान आणि असंतुलित आहार यामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

कधीकाळी हृदयविकार म्हणजे वयस्कर व्यक्तींना होणारा आजार अशी समजूत होती. मात्र आता हा समज आता धारणा पूर्णपणे बदलताना दिसतोय. भारतात तरुण वयोगटातही हार्ट अटॅकचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढताना दिसतंय. ३० ते ४५ वयोगटातील तरुणांमध्ये अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येतायत.

तज्ज्ञांच्या मते, बदलती जीवनशैली, तणावपूर्ण कामाचं वातावरण, अनियमित आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, मद्यपान आणि अपुरी झोप ही या वाढीमागील प्रमुख कारणं आहेत. विशेषतः आयटी, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणांमध्ये हा धोका अधिक असल्याचे माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कार्डियाक सर्जन डॉ. डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितलं की, आज अनेक तरुणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्ट्रॅालची समस्या वाढताना दिसतेय. हे सर्व घटक हृदयविकाराचा धोका वाढवतात. त्याचप्रमाणे कोविडनंतरच्या काळात हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणामही आता दिसून येतात.

मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कार्डियाक सर्जन डॉ. डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितलं की, आज अनेक तरुणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि हाय कोलेस्ट्रॅालची समस्या वाढताना दिसतेय. हे सर्व घटक हृदयविकाराचा धोका वाढवतात. त्याचप्रमाणे कोविडनंतरच्या काळात हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणामही आता दिसून येतात.

नियमित आरोग्य तपासणी

तरुणांनी नियमित आरोग्य तपासणी करावी असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. विशेषतः तिशीनंतर रक्तदाब, शुगर, कोलेस्ट्रॅाल आणि ईसीजी तपासणी करणं गरजेचं आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणं आणि पुरेशी झोप घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी करता येऊ शकतो.

हार्ट अटॅक ही आता केवळ वयोवृद्धांची समस्या राहिलेली नसून तरुणांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास भविष्यातील धोके वाढू शकतात.

संतुलित आणि सकस आहाराचं सेवन

  • तेलकट, तिखट, फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचं सेवन टाळावं

  • भाज्या, फळे, तृणधान्य, डाळी, कडधान्यांचा आहारात समावेश करा

  • मीठ, साखर आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण मर्यादित ठेवा

नियमित व्यायाम करा

  • दररोज किमान ३० मिनिटं चालणं, योग, सायकलिंग किंवा हलका व्यायाम

  • आठवड्यातून किमान ५ दिवस शारीरिक हालचाल करा

ताण-तणावावर नियंत्रण ठेवा

  • सततचा मानसिक ताण हृदयासाठी घातक ठरतो

  • ध्यान, प्राणायाम, छंद जोपासणे आणि पुरेशी विश्रांती घेणं गरजेचं

धूम्रपान व मद्यपानासारखे व्यसन टाळा

धूम्रपान हे हार्ट अटॅकचं प्रमुख कारण आहे. त्यामुळे धूम्रपान टाळल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो. मद्यपान मर्यादित किंवा पूर्णपणे टाळणं फायदेशीर ठरतं.

वजन, रक्तदाब व साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवा

  • वजन नियंत्रित राखा

  • रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी करा.

पुरेशी झोप

दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घ्या.

नियमित आरोग्य तपासणी करा

  • कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असल्यास विशेष काळजी घ्या

  • कोणतीही लक्षणं नसली तरी वार्षिक तपासणी करणं गरजेचं आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GAS: पुण्यात "या" मैत्रीचं त्रिकूट, गप्पा गोष्टी आणि किस्से, तिघांनी गाजवले राजकीय कट्टे

Tejashri Pradhan: तूला पाहताच हृदयात वाजे समथिंग...

Working Women Mangalsutra Designs: वर्किग वुमनसाठी सिंपल पण युनिक असे 5 मंगळसूत्र डिझाईन्स

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेसाठी काँग्रेसकडून गटनेते पदाची नियुक्ती

KDMC Mayor : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? शिंदेंच्या या २ शिलेदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT