Lung Cancer From Mild Cough saam tv
लाईफस्टाईल

Lung Cancer: साधा खोकलाही असू शकतो फुफ्फुसांच्या कॅन्सरचं लक्षण; आयुष मंत्रालयाने सांगितले महत्त्वाचे संकेत

Lung Cancer From Mild Cough: आयुष मंत्रालयाने नागरिकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. मंत्रालयाच्या मते, साधा खोकला देखील फुफ्फुसाच्या कॅन्सरचं सुरुवातीचे लक्षण असू शकतं.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल लाईफस्टाईल संबंधित आजारांचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतंय. मात्र आता मधुमेह आणि थायरॉईड या समस्या देखील वेगाने वाढताना दिसतायत. दर १० पैकी सात जणांना या आजारांनी ग्रासलं असल्याची माहिती आहे.

या आजारांनंतर, देशभरात फुफ्फुसाचा कॅन्सरचं प्रमाणही झपाट्याने वाढताना दिसतंय. आयसीएमआरच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये पुरुषांमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचे ८१,२१९ नवीन रुग्ण आणि महिलांमध्ये ३०,१०९ रुग्ण आढळल्याची माहिती आहे. या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, आयुष मंत्रालय या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढे आलंय.

आयुष मंत्रालयाने दिला इशारा

आयुष मंत्रालयाने नुकतंच फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणं आणि उपचार कसे असतात यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. मंत्रालयाच्या मते, साधा खोकला किंवा सामान्य श्वसन समस्या कधीकधी कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात. फुफ्फुसाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं बहुतेकदा सौम्य असतात आणि सामान्य समस्यांसारखीच असतात.

त्यामुळे अनेकदा लोकं याकडे दुर्लक्ष करतात आणि आजाराचं निदान अनेकदा उशिरा होतं. सततचा खोकला, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत दुखणं किंवा अस्पष्ट वजन कमी होणं यांसारखी लक्षणं लोकांनी गांभीर्याने घेतली पाहिजेत.

कॅन्सरचं कारण केवळ धुम्रपान नाही

आयुष मंत्रालयाने स्पष्ट केलंय की, फुफ्फुसांचा कॅन्सर हा केवळ तंबाखू आणि धूम्रपानामुळे होत नाही. सेकंड हँड स्मोकिंग, वायू प्रदूषण आणि रसायनं किंवा एस्बेस्टोस असलेल्या उद्योगांमध्ये काम केल्याने या आजाराचा धोका वाढतो. जर लक्षणं लवकर ओळखली गेली आणि उपचार सुरू केले तर अनेकांचे जीव वाचू शकतात.

शरीरात कसा होतो फुफ्फुसांचा कॅन्सर

फुफ्फुसाच्या पेशी नवीन पेशी तयार करण्यासाठी वेगळ्या होतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. दरम्यान कधीकधी या पेशी अनियमितपणे वाढतात आणि ट्यूमर तयार करतात. अशावेळी तो अवयव योग्यरित्या काम करू शकत नाही.

फुफ्फुसाच्या कॅन्सरचे दोन मुख्य प्रकार आहेत. यामध्ये नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर आणि स्मॉल सेल लंग कॅन्सर. भारतात नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर अधिक सामान्यपणे पाहायला मिळतो. तर लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार करता येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

SCROLL FOR NEXT