European Union fined Google Saam tv
लाईफस्टाईल

Google Vs European Union: अबब! गुगलला भरावा लागणार तब्बल 2296 कोटींचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण

अबब! गुगलला भरावा लागणार तब्बल 2296 कोटींचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण

साम टिव्ही ब्युरो

European Union fined Google: जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलवर अनेकदा इतर ब्रँड्सना बाजारात स्थान निर्माण करू देत नसल्याचा आरोप केला जातो. गुगलच्या या पद्धतींमुळे कंपनीला अनेकदा कारवाईलाही सामोरे जावे लागले आहे.

आता गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटला युरोपियन युनियन (EU) नियामकांनी मोठा दंड ठोठावला आहे. EU नियामकांना असे आढळले आहे की, गुगल आपल्या स्पर्धकांना बाजारात स्थान निर्माण करू देत नाही.

EU च्या या निर्णयामुळे गुगलच्या अडचणी वाढू शकतात. कारण यावेळी कंपनीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यवसायावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कंपनीच्या अॅडटेक व्यवसायाचा गेल्या वर्षीच्या एकूण कमाईपैकी ७९ टक्के वाटा होता आणि गुगल इतर कंपन्यांना या व्यवसायात येऊ देत नसल्याचा आरोप आहे. २०२२ मध्ये कंपनीने तिच्या विविध सेवांमधून एकूण २२४.५ अब्ज (सुमारे १८ लाख कोटी रुपये) जाहिरात महसूल जमा केला आहे.

दोन वर्षांपासून सुरू आहे तपास

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, EU Antitrust चीफ मार्गारेट वेस्टेजर यांनी म्हटले आहे की, गुगलला त्याच्या अॅडटेक व्यवसायाचा काही भाग विकावा लागेल. कारण कंपनीला इतर कंपन्यांना स्पर्धाविरोधी पद्धती रोखण्यासाठी जागा आणि संधी द्यावी लागेल. जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तपासानंतर युरोपियन युनियनने गुगलवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुगलला याआधीही अनेकदा दंड ठोठावण्यात आला

गुगलला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी EU, दक्षिण कोरिया आणि भारताच्या एजन्सींनीही कंपनीवर कारवाई केली आहे. गुगलचा मार्केट मोठा आहे. अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीममुळे त्याचा युजरबेसही मोठा आहे. यामध्ये कंपनीला कोणतीही स्पर्धा नको आहे, असा आरोप आहे. (Latest Marathi News)

रिसर्च फर्म इनसाइडर इंटेलिजेंसच्या मते, गुगल सध्या एकूण जागतिक जाहिरात महसूलाच्या २८ टक्के मार्केट शेअरसह जगातील सर्वात मोठे डिजिटल जाहिरात प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे इतर ब्रँड्सना जागा मिळत नसल्याने गुगल स्पर्धा कमी करत असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT