Empty Stomach Exercise
Empty Stomach Exercise  Saam Tv
लाईफस्टाईल

Empty Stomach Exercise : सावधान ! रिकाम्या पोटी व्यायाम करताय ? फायदा होतो की, नुकसान

कोमल दामुद्रे

Empty Stomach Exercise : व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहाते. सकाळी व्यायाम केल्याने आपला दिवस ऊर्जात्मक राहातो. परंतु, रिकाम्या पोटी व्यायाम करणे योग्य आहे की, नाही असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात वारंवार येतो.

रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने शरीराला जितके फायदे होतात तितकेच नुकसान होते. रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. परंतु, व्यायामामुळे डिहायड्रेशन आणि रक्तातील साखरेची (Sugar) पातळी कमी होऊ शकते. रिकाम्या पोटी व्यायाम करणे कितपत योग्य आहे हे जाणून घेऊया.

रिकाम्या पोटी व्यायाम करण्याचे फायदे -

१. वजन कमी करण्यासाठी आणि स्नायूंच्या वस्तुमानासाठी फायदेशीर -

रिकाम्या पोटी व्यायाम केल्यास वजन कमी (Weight loss) होण्यास मदत होते. रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने ऊर्जा खर्च होते आणि त्यामुळे अधिक कॅलरी बर्न होते. त्याच वेळी, रिकाम्या पोटी व्यायाम करणे स्नायूंसाठी देखील फायदेशीर आहे. रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात आणि आपल्याला ताकद मिळते.

२. प्रतिकारशक्ती मजबूत होते-

रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. जे लोक व्यायाम करतात ते इतर लोकांपेक्षा कमी आजारी पडतात. याशिवाय रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. व्यायाम केल्याने शरीराचे सर्व अवयव व्यवस्थित काम करतात.

रिकाम्या पोटी व्यायाम करण्याचे तोटे -

रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने शरीर निर्जलीकरण होते. याशिवाय उलटीची समस्याही होऊ शकते. रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने आपल्याला अस्वस्थ वाटू शकते. यासोबतच स्नायूंना दुखापत होण्याचा धोकाही असतो. म्हणूनच असा सल्ला दिला जातो की व्यायाम करण्यापूर्वी कोमट पाण्यात लिंबू घालून प्या. याशिवाय आपण मिल्क शेक किंवा बदाम शेक देखील पिऊ शकता. वर्कआउट करण्यापूर्वी डिटॉक्स ड्रिंक पिणे देखील चांगले असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाराष्ट्रात सूडाचं राजकारण कशाला हवं? इथं कट्टर विरोधकही धरतात एकमेकांचे पाय

Raj Thackeray: राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

SCROLL FOR NEXT