Elon Musk Offer Saam Tv
लाईफस्टाईल

Elon Musk Offer: विकिपीडियानंतर इलॉन मस्क यांची मेटाला ऑफर, नेमकं काय झालं?

Elon Musk: इलॉन मस्क यांनी फेसबुकला ऑफर दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Elon Musk Offer To Facebook :

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी इलॉन मस्क एक आहेत. इलॉन मस्क हे जगातील एक प्रभावशाली व्यक्तीमत्त्व आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच विकीपीडिया कंपनीला एक ऑफर दिली होती. त्यानंतर आता अशीच ऑफर फेसबुकला दिली आहे.

याबाबत दि बेलीलॉन बी या वेबसाइटने माहिती दिली आहे. एक्स या प्लॅटफॉर्मवर स्वतः एलॉन मस्क यांनी या वेबासाइटची पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकचं नाव बदलून फेसबूब ठेवल्यास मार्क झुकरबर्गला १ बिलियन डॉलर्स देऊ असे इलॉन मस्क म्हणाले आहेत.

कंपनीने नाव बदलल्यानंतर Faceboob वर लॉग इन करताना लोकांना खूप आनंद होईल असं मस्क म्हणाले होते. तसेच मी नवीन वेबसाईटसाठी विचार केला आहे. माझ्या मते, या संकल्पना चांगल्या आहेत. असंही मस्क म्हणाले.

इलॉन मस्क- मार्क झुकरबर्ग वाद

मस्क-झुकरबर्ग वाद हा काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वीच मार्क झुकरबर्गने नवीन थ्रेड अॅप लाँच केला होता. यानंतर आपल्या अॅपची कॉपी केल्याचा आरोप केला होता. त्या दोघांमधील हा वाद चांगलाच गाजत आहे.

याआधीही इलॉन मस्क यांनी अशीच ऑफर विकिपीडिया कंपनीला दिली होती. या वेबसाइटचं नाव कमीत कमी एक वर्ष Dickipedia ठेवल्यास १ बिलियन डॉलर्स देऊ असे मस्क म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane DCC Bank Election: ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कथोरे गटाचं वर्चस्व; रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंचा करिष्मा

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: भिवंडीत धावत्या एसटी बसला आग

Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा आहे? घरी बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट रस मलाई; वाचा रेसिपी

जेवण उशिरा दिल्याच्या रागातून रक्तरंजित थरार! भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT