Eco-Friendly Ganpati Saam Tv
लाईफस्टाईल

Eco-Friendly Ganpati : निसर्गाचे सवंर्धन करुया, बाप्पाची इको फ्रेंडली मूर्ती घरीच्या घरी बनवूया !

जलप्रदूषण टाळण्यासाठी इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती कशी बनवाल ?

कोमल दामुद्रे

Eco-Friendly Ganpati : मुंबईसारख्या शहरात गणेशोत्सव हा सण दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने भाविक गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणून त्यांची मनोभावाने पूजा करतात. तसेच सार्वजनिक ठिकाणी ही मोठ्या गणपतीच्या मुर्त्या बसविण्यात येतात. हा उत्सव साजरा करण्यामागे खूप जुनी परंपरा आहे.

सध्या गणेशोत्सव हा ३१ ऑगस्टला साजरा करण्यात येईल. दरवर्षी आपल्याला शासनामार्फत इको फ्रेंडली गणेश मूर्ती बसवण्यास सांगतात. परंतु, गणपती हे प्रत्येकाचे श्रध्दा स्थान असल्यामुळे आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो.

दहा दिवसाच्या नंतर याच गणपतींच्या जेव्हा विसर्जनाची वेळ येते. त्यावेळेस मात्र हे गणपती आपण नदी, तलाव, विहिर किंवा समुद्रामध्ये विसर्जनासाठी नेतो, त्यावेळेस होणारे जलप्रदूषण याची आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणून इको फ्रेंडली गणपती बनवून आपण या जल प्रदूषणाला आळा घालू शकतो.

जर घरीच सुरक्षित राहायचे असेल तसेच आपल्याला जलप्रदूषण टाळायचे असेल, तर श्री गणेश चतुर्थी उत्सवही साजरा करायचा असेल तर बाजारपेठेत गणेश मूर्ती मिळो अथवा न मिळो. पण आपण निश्चितपणे घरी इकोफ्रेंडली गणपती (Ganpati) मूर्ती बनवू शकता. तर ती मूर्ती कशी बनवावी ते पाहूया.

मातीने बनवण्याची प्रक्रिया -

Eco-Friendly Ganpati

१. इको फ्रेंडली मूर्ती घरी बनवण्यासाठी आपण बाजारात सहज उपलब्ध असलेल्या शाडूच्या मातीचा वापर करू शकतो.

२. मूर्ती बनवण्यासाठी आधी एक छान चौकोनी लाकडाचा तुकडा निवडा ज्यावर मूर्तीची स्थापना करता येईल.

३. मूर्ती बनवण्यासाठी चिकणमाती स्वच्छ करून त्यात पाणी घालून माती पिठासारखी चांगली मळून घ्यावी.

४. चिकणमाती थोडा वेळ विश्रांतीसाठी ठेवा. १ तासानंतर मातीपासून मूर्तीचा आकार तयार करा, मूर्तीला आकार दिल्यानंतर मूर्तीमध्ये एक लहान सोंड आणि हात-पाय घाला आणि सुकण्यासाठी सोडा.

५. जेव्हा मूर्ती चांगली सुकते तेव्हा आपण तिला वॉटरप्रुफ रंगाने रंगवू शकतो. पाण्याचा रंग पक्का होण्यासाठी त्यात फेव्हिकॉल टाकता येते.

६. मूर्तीला रंगांनी सजवल्यानंतर फुलांच्या माळा आणि मोत्यांचे छोटे दागिने घालून सजवू शकतो

गणपती विसर्जन कसे कराल ? -

Ganpati Visarjan

घरीच कृत्रिम तलाव तयार करा आणि गणपतीचे विसर्जन करुन ती चिकणमाती २ ते ३ दिवस तशीच ठेवून द्या. त्यानंतर आपल्या झाडांच्या कुंडीत टाका ज्यामुळे झाडांना (Tree) त्याचे पोषण मिळेल व जलप्रदूषण होणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महाराष्ट्रात पैशांची ढगफुटी; निवडणुकीत शेकडो कोटीचा धुरळा

Assembly Election: बारामती नको,शिरुर हवं; स्वत:अजित पवारांनीच केला खुलासा

Maharashtra Election: महायुतीसाठी RSSचे स्पेशल 65; मविआची प्रत्येक चाल ठरवणार फोल?

Maharashtra Election : भाजपचा नारा, काँग्रेसचं उत्तर; बटेंगेचं फावणार की जुडेंगे जिंकणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar : 'बारामतीतून उभं राहणार नव्हतो, तर....'; भरसभेत अजित पवारांचा मोठा खुलासा, VIDEO

SCROLL FOR NEXT