Ganesh Chaturthi 2022 : गणेशोत्सव म्हटलं की, सर्वत्र नुसता जल्लोष असतो. गणपतीला हिंदू धर्मातील बुध्दीचा अधिष्ठाता, विघ्नंहर्ता मानले जाते. भारतात (India) श्रीगणेशाला अधिक महत्त्व आहे.
महाराष्ट्रात गणपतीला विशेष पूजले जाते. सर्व देवतांच्या आधी गणपतीला पूजले जाते. तसेच प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थी अधिक पटींने महत्त्वाची मानली जाते.
यंदा गणेशोत्सव हा ३१ ऑगस्ट बुधवारी साजरा करण्यात येईल. अवघ्या काही दिवसात गणपती घरोघरी पाहायला मिळतील. सध्या बाजारात गणपती आल्याने खरेदी, मखर, मोदक, आरती अशी बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळताय. परंतु, त्या सगळ्या गोष्टी ठिकं आहे पण गणपतीच्या (Ganpati) काळात आरती हा खूप जवळचा विषय, पण तितकाच अनेकांना न जमणारा.
या काळात घरोघरी गणपती असल्यामुळे प्रत्येक घरातून आरतीचा नादमय आवाज ऐकू येतो. काही वेळेस ही आरती ओघाओघाने बोलताना चुकणारेही बरेच असतात. पण त्यातील काही जण बाप्पाची आरती बिनधास्तपणे चुकीची म्हणून मोकळे होतात. याचे कारण आरती एक तर अनेकांना पाठ नसते किंवा त्याचे उच्चार व शब्द नीच ठाऊक नसतात.
कितीही म्हटंल तरी मधूनच कडव अर्धवट बोलणारी किंवा विसरणारी मंडळी देखील त्यात आहेतच परंतु, फक्त फक्त जय देव जय देवला आवाज वाढवणारी पोरं या साऱ्यांमुळे आरती बोलण्याचा जोष आणखी वाढतो.
बाप्पाचं मोठ पोट आणि सुपासारखे असणारे कान आपण केलेली चुक त्यावेळी पदरात घेतात. मग अगदी 'फळीवरच्या वंदना' पासून ते 'संकष्टी'लाच पावण्यापर्यंत अनेक मागण्या असे भक्त गणरायाकडे करतात. पण काहींना आरती चुकीची म्हटली की, ती खटकते आणि सालाबादप्रमाणे दर गणेशोत्सवाआधी आरतीमधील उच्चारांचे विनोद व्हायर करुन त्यांच्यामार्फत स्पष्ट उच्चार करण्याचे प्रबोधन केले जाते.
आरती म्हणताना आपल्याकडून होणाऱ्या या चूका टाळा -
१. संकष्टी पावावे नव्हे - संकटी पावावे
२. ओवाळू आरत्या सुरवंटया येती नव्हे - ओवाळू आरत्या कुरवंड्या येती
३. दास रामाचा वाट पाहे सजणा नव्हे - दास रामाचा वाट पाहे सदना
४. लवलवती विक्राळा - लवथवती विक्राळा
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. कोणाचीही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.