Cucumber freepik
लाईफस्टाईल

Cucumber: उन्हाळ्यात काकडी खाणं ठरत फायदेशीर, जाणून घ्या मोठे फायदे

Cucumber Health Benefits In Summer: उन्हाळ्यात आपल्याला शरीराला थंडावा देणाऱ्या गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात, जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळ्यात शरीराला थंड आणि हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. कडक उन्हामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. म्हणूनच उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट करणाऱ्या गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. काकडीत भरपूर पाणी असते. यामध्ये, व्हिटॅमिन ए, सी, के, पोटॅशियम, फायबर असे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. काकडी अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. म्हणून उन्हाळ्यात काकडीचा डाएटमध्ये नक्की समावेश करा.तसेच काकडी अनेक लोकांसाठी वरदान आहे. काकडी खाण्याचे फायदे कोणते, जाणून घ्या.

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवते

डिहायड्रेशन ही एक गंभीर समस्या आहे. डिहायड्रेशनमध्ये चक्कर येणे, डोकेदुखी आणि अशक्तपणा येऊ शकतो. काकडी तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करते. काकडीमध्ये ९६% पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवते आणि ऊर्जा देण्याचे काम करते.

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

उच्च रक्तदाबाची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. उन्हाळ्यात ही समस्या आणखी वाढते. काकडीत असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय ते हृदय निरोगी ठेवते. ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी काकडी नक्कीच खावी.

वजन कमी करण्यास मदत होते

जर तुम्हाला सोप्या पद्धतीने वजन कमी करायचे असेल तर काकडीचा डाएटमध्ये समावेश करा. काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. तसेच, यामध्ये असलेले फायबर पोट बराच काळ भरलेले ठेवते. ज्यामुळे भूक लागत नाही आणि तुम्ही जास्त खाणं टाळता.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते

काकडी खाल्ल्याने तुमचे कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही नियंत्रणात राहते. यात असलेले स्टेरॉल नावाचे घटक शरीरात कोलेस्ट्रॉलची योग्य पातळी राखण्यास मदत करते.

पचनक्रिया निरोगी ठेवते

जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर उन्हाळ्यात काकडी खावी. यामध्ये असलेले फायबर पोटाच्या समस्या दूर करते. बद्धकोष्ठता, गॅस आणि अ‍ॅसिडिटी सारख्या समस्या कमी करण्यासाठी काकडी प्रभावी आहे. उन्हाळ्यात दह्यामध्ये काकडी मिसळून खाणे हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी महानगरपालिका निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये जम्बो पक्षप्रवेश

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT