Diabetes: लठ्ठपणा आणि मधुमेह कमी करण्यासाठी नवं औषध लाँच, किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल

American Company Launched Mounjaro Medicine on Diabetes: प्रसिद्ध अमेरिकन फार्मा कंपनी एली लिलीने भारतात मधुमेह आणि लठ्ठपणासाठी एक औषध लाँच केले आहे. या औषधाची किंमत किती असणार आहे, जाणून घ्या.
Diabetes
Diabetesgoogle
Published On

प्रसिद्ध अमेरिकन फार्मा कंपनी एली लिलीने मधुमेह आणि लठ्ठपणासाठी भारतात एक प्रभावी औषध लाँच केले आहे. या सिंगल डोस औषधाचे नाव मुंजारो (टिर्झेपाटाइड) आहे. हे औषध लठ्ठपणा, जास्त वजन आणि टाइप २ मधुमेहासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे औषध पहिल्यांदाच लठ्ठपणा, जास्त वजन आणि टाइप २ मधुमेहासाठी बनवण्यात आले आहे. भारतात लठ्ठपणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात १० कोटींहून अधिक लोक लठ्ठपणाने तर, १० कोटी लोक लठ्ठपणामुळे मधुमेहाने ग्रस्त आहेत. अमेरिकन कंपनीने लाँच केलेल्या या औषधाची किंमत किती आहे? जाणून घ्या.

मुंजारो (टिर्झेपाटाइड)

या औषधाचे नाव मुंजारो (टिर्झेपाटाइड) आहे. हे औषध एका सिंगल डोसच्या बाटलीत लाँच करण्यात आले आहे. कंपनीने सांगितले आहे की, या औषधासाठी सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) कडून मंजुरी मिळाली होती. कंपनीचे म्हणणे आहे की, हे औषध GIP (ग्लुकोज- डिपेंडंट इन्सुलिनोट्रोपिक पॉलीपेप्टाइड) आणि GLP-1 (ग्लुकॅगॉन-लाइक पेप्टाइड-1) हार्मोन रिसेप्टर्स दोन्ही सक्रिय करते.

Diabetes
Diabetic Retinopathy: डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय? मधुमेहींनी वेळीच उपचार करा, नाहीतर दृष्टीवर होईल परिणाम

या औषधाचा वापर मधुमेह आणि लठ्ठपणासाठी केले जाते. क्लिनिकल चाचण्यांमध्ये असे आढळून आले की १५ मिलीग्राम डोस घेणाऱ्या रुग्णांचे २१.८ किलो पर्यंत वजन कमी झाले, तर ५ मिलीग्राम डोस घेणाऱ्या रुग्णांचे १५.४ किलो वजन कमी झाले. मधुमेह आणि लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी GLP-1 औषधांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

औषधाची किंमत किती?

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, मुंजारो औषधाच्या २.५ मिलीग्रामच्या एका सिंगल बाटलीची किंमत ३,५०० रूपये आहे. आणि ५ मिलीग्रामच्या बाटलीची किंमत ४,३७५ रूपये आहे. हे औषध आठवड्यातून एकदा घ्यावे लागते. जर एका रुग्णांने एक महिना डोस घेतला तर त्याला १४,००० ते १८,००० रुपये खर्च करावे लागतील. या औषधांचा खर्च हा डॉक्टर किती डोस घेण्यास सांगतात यांच्या सल्ल्यावर अवलंबून असेल. अमेरिकेत मुंजारोची किंमत दरमहा $१,०००-$१,२०० म्हणजेच सुमारे ८६,००० ते १ लाख रूपयांपर्यंत आहे. त्या तुलनेत, हे औषध भारतात खूपच स्वस्त आहे. भारतात या औषधाची किंमत कमी ठेवण्याचा उद्देश हा आहे की हे औषध जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे.

Diabetes
Health Tips: उन्हाळ्यात दररोज 'ही' एक गोष्ट खाण्याची सवय लावा, डिहायड्रेशनसह या समस्याही होतील दूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com