Hypertension, Health tips
Hypertension, Health tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी आहारात या फळांचे सेवन करा

कोमल दामुद्रे

मुंबई : दैनंदिन जीवनात बदलेल्या आहारामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. धुम्रपान, मद्यपान व तंबाखूसेवन न केल्यास आपला ताणतणाव कमी होऊन आपण उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकतो.

हे देखील पहा -

उच्च रक्तदाबात बहुतेक वेळा त्याची लक्षणे आपल्याला दिसून येत नाही. याची औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. त्यामुळे बरेचदा आपल्याला त्याचा कंटाळा येतो. उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी व त्यावर नियमित औषधे घेणे गरजेचे आहे. तसेच त्यावर मात करण्यासाठी आपण आहारात अशा काही फळांचा समावेश करु शकतो ज्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहिल.

आहारात या फळांचा समावेश करा -

१. केळीत अधिक प्रमाणात पोटॅशियम व खनिजे आढळतात. शरीरातील रक्तदाब वाढल्यास पोटॅशियम व खनिजांची कमतरता भासते. अशावेळी केळीत असणाऱ्या पोटॅशियममुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकले जातात व रक्तदाब कमी होण्यापासून देखील संरक्षण मिळते.

२. संत्री , द्राक्षे यांसारख्या फळांमध्ये (Fruit) पोटॅशियम, जीवनसत्त्व (Vitamins) व फायबर जास्त प्रमाणात असते. या फळांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याची क्षमता असते. तसेच यामुळे ब्लड प्रेशर देखील नियंत्रणात राहते.

३. पपईत अधिक प्रमाणात पोटॅशियम व मॅग्नेशियम, फ्लवोनॉइड मोठ्या प्रमाणात असते. यात असणाऱ्या घटकांमुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

४. बटाटा व रताळ्यात सोडीयमचे प्रमाण कमी व पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे रक्तदाबाची पातळी वाढत नाही.तसेच यामधील चांगल्या प्रमाणात असलेल्या मॅग्रेशियममुळे आपला रक्तप्रवाह सुधारतो व आपल्या शरीरातील मिनरल्सची पातळी देखील संतुलित राहते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

SCROLL FOR NEXT