Weight Loss Tips freepik
लाईफस्टाईल

Weight Loss: ऑफिसमध्ये बसून पोटाची चरबी वाढली आहे? बेली फॅट कमी करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Weight Loss Tips: वाढत्या वजनामुळे अनेक लोकांना त्रास होतो. विशेषतः पोटाभोवती जमा होणारी चरबी तुमचा लूक खराब करतेच पण तुमचा आत्मविश्वासही कमी करते. म्हणून वेळीच त्यावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बऱ्याचदा लोक स्लिम आणि परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी अनेक उपाय करतात. क्वचितच असा कोणी असेल ज्याला फिट आणि सुंदर दिसणे आवडत नसेल. वाईट जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे लोकांची ही इच्छा अनेकदा अपूर्ण राहते. यामुळे आजकाल बरेच लोक लठ्ठपणाचे बळी ठरत आहेत. गेल्या काही काळापासून लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या म्हणून समोर आली आहे. यामुळे अनेक धोकादायक आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात. त्यावर वेळीच नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.

ऑफिसमध्ये सतत स्क्रीनसमोर खुर्चीवर बसल्याने लोकांचे वजन वाढू शकते. वाढत्या वजनामुळे तुमचा लूकच खराब होत नाही तर तुमचा आत्मविश्वासही कमी होतो. डाएटिंग आणि व्यायामाव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये काही गोष्टींचा समावेश करुन तुमच्या पोटाची वाढती चरबी (Tips To Reduce Belly Fat) कमी करू शकता.

कोमट पाणी

सकाळी उठल्यावर सर्वात आधी एक ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. असे केल्याने तुमच्या पचनक्रियेला गति मिळते. आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे पचनक्रिया सुधारते. आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे.

सकाळचा व्यायाम

कॅलरीज बर्न करण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी व्यायाम खूप महत्वाचा आहे. म्हणून तुमचा दिवस सकाळच्या व्यायामाने सुरू करा. यासाठी, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सकाळी फिरायला जाऊ शकता किंवा घरी काही सोपे व्यायाम करू शकता. या सवयीचे पालन केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.

प्रथिनेयुक्त नाश्ता करा

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, आहारात प्रथिनांचा समावेश करणे महत्वाचे आहे. यासाठी सकाळी प्रथिनेयुक्त नाश्ता करा. जेणेकरून तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहील आणि तुम्ही दिवसभर अनहेल्दी स्नॅक्स खाणे टाळू शकाल. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंडी, ग्रीक दही किंवा प्रोटीन शेक समाविष्ट करू शकता. याशिवाय, तुमच्या नाश्त्यात फायबर आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करु शकता.

नाश्त्यात गोड पदार्थ खाणे टाळा

जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात निरोगी हवी असेल आणि तुमचे वजन नियंत्रित करायचे असेल तर सकाळी गोड पदार्थ खाणे टाळा. नाश्त्यात गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. ज्यामुळे विशेषतः पोटाभोवती चरबी जमा होते. म्हणून, इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी, नाश्त्यामध्ये संपूर्ण धान्य, लीन प्रोटीन आणि ताजी फळे यासारखे हेल्दी गोष्टींचा समावेश करा.

पुरेशी झोप घ्या

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी चांगली झोप अत्यंत महत्त्वाची आहे. झोपेचा अभाव तुमच्या हार्मोन्समध्ये व्यत्यय आणू शकतो. यामुळे अनहेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. आणि वजन वाढू शकते. विशेषतः पोटाभोवती चरबी लवकर जमा होते. म्हणून, दररोज ७-८ तासांची झोप घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT