Secret Ingredient for Quick & Grainy Ghee Saam
लाईफस्टाईल

कुकर अन् चमचाभर 'ही' पांढरी गोष्ट; तूप तयार करण्याची पाहा सर्वात सोपी पद्धत, मिनिटांत तूप तयार

Secret Ingredient for Quick & Grainy Ghee: घरगुती तूप तयार करण्याची सोपी पद्धत. प्रेशर कूकर अन् बेकिंग सोड्याचा वापर करून घरगुती तूप तयार करा.

Bhagyashree Kamble

देशी तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत. देशी तूप खाल्ल्यानं आरोग्याला अनेक फायदे मिळतात. मात्र, बाजारातील तुपामध्ये भेसळ असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे घरगुती तूप खाणं केव्हाही उत्तम. घरगुती तूप बनवणं हे अनेकांना वेळखाऊ आणि कटकटीचं काम वाटतं. पण आपण सोप्या टिप्सने घरगुती तूप तयार करू शकता.

यूट्यूबर पूनम देवनानी यांनी तूप तयार करण्यासाठी सोपी टीप शेअर केली आहे. या टीपमुळे दाणेदार तूप तयार होते. शिवाय घरचं तूप म्हटल्यावर आरोग्यासाठीही उत्तम ठरते. घरगुती तूप नेमकं कसे तयार करावे? पाहा खास सोप्या टिप्स.

सर्वात आधी प्रेशर कुकर गॅसवर ठेवा. त्यात पाणी आणि मलाई घाला. गॅस मंद आचेवर ठेवा. दोन्ही गोष्टी एकत्र केल्यानंतर कुकरचं झाकण लावा आणि कुकरची शिट्टी होऊ द्या. एक शिट्टी झाल्यानंतर झाकण उघडा आणि गॅस मंद आचेवर ठेवून ढवळत राहा. दाणेदार तूप दिसल्यानंतर त्यात १/८ चमचा बेकिंग सोडा घाला. नंतर मिक्स करा.

बेकिंग सोड्यामुळे तूप लवकर तयार होते. तूप तयार झाल्यानंतर गॅस बंद करा आणि तूप गाळून घ्या. महत्वाची टीप - एक तास आधी मलाई रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढा. नंतर त्याचं तूप तयार करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ड्रॅगन पॅलेसला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Election: मोठी बातमी! भाजपची आणखी एका पक्षासोबत युती, अमित शाह यांची दिल्लीत घोषणा

Kitchen Tips : थंडीत इडलीचं पीठ फुलत नाही? मग या 8 भन्नाट टिप्स वापरा, इडली होईल मऊ आणि स्पंजसारखी

WTC 2027 Final: टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा मार्ग खडतर? जाणून घ्या कसं आहे संपूर्ण समीकरण

MSRTC NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! NCMC कार्डबाबत नेमकं काय बदललं?

SCROLL FOR NEXT