Lung cancer symptoms SAAM TV
लाईफस्टाईल

Lung cancer symptoms: 5 अशी लक्षणं दिसतायत तर असू शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर; वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

Skin signs cancer: फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणं केवळ श्वसनापुरती मर्यादित नसून त्वचेवरही दिसू शकतात. गाठी, खाज, कावीळ आणि नखांमध्ये बदल हे गंभीर संकेत असू शकतात. अशी लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

शरीरात कोणताही बिघाड झाला की तुम्हाला लगेच त्याची काही ना काही लक्षणं दिसून येतात. अशातच जर तुम्हाला कोणताही कॅन्सर झाला असेल तर त्याची लक्षणंही तुम्हाला दिसू लागतात. असंच जर तुम्हाला फुफ्फुसांचा कॅन्सर झाला असेल तर त्याची लक्षणं केवळ श्वासांपुरती मर्यादित नसतात. तर त्याची लक्षणं ही तुम्हाला त्वचेवरही दिसून येतात

फुफ्फुसांचा कॅन्सर हा आपल्या श्वसनमार्गातील पेशींमध्ये सुरू होतो. या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि त्यामुळे कॅन्सर तयार होतो. या कॅन्सरचे दोन मुख्य प्रकार आहेत. हे प्रकार म्हणजे नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (NSCLC) आणि स्मॉल सेल लंग कॅन्सर (SCLC). NSCLC हा सुमारे 85 टक्के रुग्णांमध्ये आढळतो आणि तो तुलनेने हळू वाढतो. याची लक्षणं काय दिसून येतात ती पाहूयात.

त्वचेवर गाठी दिसणं

काही वेळा कॅन्सरच्या पेशी रक्ताद्वारे शरीराच्या इतर भागात पोहोचचाच. त्यामुळे छाती, पाठ, मान किंवा टाळूवर गाठी तयार होतात. या गाठी साधारणपणे दुखत नाहीत. पण त्या लालसर, निळसर किंवा त्वचेच्या रंगाच्या असू शकतात. काही वेळा त्या फुटून जखमेसारख्या दिसू शकतात. अशा गाठी दिसणं म्हणजे कॅन्सर शरीरात पसरल्याचे संकेत असू शकतात.

सतत खाज येणं

काही प्रकारचे लंग कॅन्सर शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. अशा ज्यामुळे त्वचेवर अनोख्या प्रकारचे पुरळ किंवा सतत खाज येऊ शकते. याशिवाय डोळ्यांच्या भोवती जांभळट-लाल रंगाचे पुरळ किंवा हातांच्या बोटांवर डाग दिसू शकतात. ही लक्षणं फुफ्पुसांच्या कॅन्सरची मानली जातात.

कावीळ होणं

जर कॅन्सर यकृतापर्यंत पसरला तर पित्तनलिकांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळसर होतो. याला कावीळ किंवा जॉन्डिस म्हणतात. यासोबत थकवा आणि वजन कमी होणं अशी लक्षणंही दिसू शकतात. हे संकेत अंतर्गत अवयवांवर परिणाम होत असल्याचे दर्शवतात.

बोटं आणि नखांमध्ये बदल (क्लबिंग)

जर फुफ्फुसांशी संबंधित समस्या असल्यास बोटांच्या टोकांचा आकार बदलू शकतो. बोटं काहीशी फुगल्यासारखी दिसून येतात आणि नखं खाली वाकलेली वाटतात. याला क्लबिंग म्हणतात. रक्तातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे हा बदल होतो.

त्वचेच्या रंगात बदल

काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्वचेवर जाडसर, मऊ डाग दिसून येतात. याला ट्राइप पाम्स म्हणतात. तसंच मान आणि त्वचेवर काळपट डाग दिसू शकतात. याला अ‍ॅकँथोसिस नायग्रिकन्स म्हणतात. हे बदल शरीरात तयार होणाऱ्या विशिष्ट रसायनांमुळे होतात आणि ते लंग कॅन्सरशी संबंधित असू शकतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soybean Chilla: नाश्त्यासाठी बनवा प्रोटीनयुक्त टेस्टी सोयाबीन चीला; फक्त १५ मिनिटांत तयार होणारी स्वादिष्ट रेसिपी

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT