Kidney Failure Symptoms google
लाईफस्टाईल

Early symptoms of kidney failure: कंबरदुखी, सतत लघवी होणं आणि...! शरीरातील हे संकेत सांगतात किडनी खराब झालीये

What Are The First Signs Of Kidney Failure: किडनी खराब होण्यापूर्वी शरीर कोणते सिग्नल देतं? पाठदुखी, वारंवार लघवी, सूज, थकवा यांसारखी लक्षणं ओळखा आणि वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव मानला जातो. शरीरातील टॉक्सिन पदार्थ काढून टाकणं आणि पाणी तसंच इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन राखणं हे किडनीचं महत्त्वाचं काम आहे. जेव्हा तुमची किडनी योग्यरित्या काम करू शकत नाही तेव्हा तुमचं शरीर तुम्हाला काही नाही काही सिग्नल देत असतं. दरम्यान या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

काय दिसून येतात याची लक्षणं?

हेल्थ वेबसाईट न्यूजपॉइंटनुसार, किडनीच्या समस्येमुळे अनेकदा पाठीच्या खालच्या भागात किंवा बरगड्यांच्या खाली वेदना होतात. या वेदना कधीकधी पोटाच्या बाजूला किंवा कंबरेभोवती पसरू शकतात. सुरुवातीला या वेदना सौम्य असतात परंतु हळूहळू त्या पाठीचा कणा, मांड्या आणि पोटात पसरतात. जर इतर लक्षणांसह तुम्हाला सतत पाठदुखी होत असेल तर त्यावर वेळीच उपचार केले पाहिजेत.

किडनी खराब होण्यापूर्वी सुरुवातीचं एक दिसून येणार लक्षणं म्हणजे वारंवार लघवी होणं. हे केवळ जास्त पाणी पिण्यामुळे होत नाही तर किडनीच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे देखील होऊ शकतं. लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणं हे देखील एक गंभीर लक्षण आहे. जे किडनी किंवा युरीनरी ट्रॅकची समस्या दर्शवतात. सामान्यतः, लघवीचा रंग फिकट पिवळा असतो. मात्र पुरेसं पाणी पिऊनही जर त्याचा रंग गडद होत असेल तर आरोग्याची टेस्ट करून पाहा.

सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर किंवा डोळ्यांखाली सूज येणं हे देखील किडनी निकामी होण्याचं लक्षण असू शकतं. हे शरीरात पाणी साचल्यामुळे होऊ शकतं. जास्त मेहनत न करता सतत थकवा जाणवणं, भूक न लागणं, वारंवार उलट्या होणं किंवा मळमळ होणं ही देखील किडनी निकामी होण्याची लक्षणं असू शकतात.

शरीरात टॉक्सिन पदार्थ जमा झाल्यामुळे अशक्तपणा जाणवू शकतो. त्वचेला सतत खाज येणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं ही देखील गंभीर लक्षणं मानली जातात.

डॉक्टरांची भेट केव्हा घेतली पाहिजे?

जर तुम्हाला यापैकी ही अधिक लक्षणं आढळली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर निदान आणि उपचार केल्यास किडनीचं गंभीर नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळे भरपूर पाणी प्या. परंतु झोपण्यापूर्वी जास्त द्रवपदार्थांचं सेवन टाळा. आहारात मीठाचं सेवन नियंत्रित करा आणि नियमित आरोग्य तपासणीचं करा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला; आखाती युद्ध पुन्हा भडकणार?

SCROLL FOR NEXT