Surabhi Jayashree Jagdish
मधुमेही रूग्णांमध्ये ताण आणि चिंता वाढल्यास शरीरात कोर्टिसोल हार्मोनचं प्रमाण वाढतं.
यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. म्हणून मानसिक शांतता राखणं खूप महत्त्वाचं आहे.
मधुमेही रुग्णांनी आहारात अचानक बदल केल्यास साखरेचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. अशावेळी खाण्यापिण्यात सातत्य आणि संतुलन ठेवणं आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आहारात बदल करणं योग्य ठरतं.
ही समस्या प्रामुख्याने मोठ्या वयातील लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. वयानुसार शरीराची साखर नियंत्रण क्षमता कमी होत जाते. म्हणून नियमित तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे.
जर शुगर अचानक वाढली तर घाबरून न जाता योग्य उपाय करणं आवश्यक आहे. वेळीच काळजी घेतल्यास गुंतागुंत टाळता येऊ शकते. यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय मदत करू शकतात.
शुगर वाढल्यावर सर्वप्रथम जास्तीत जास्त पाणी पिणं फायदेशीर ठरतं. पाणी शरीरातील अतिरिक्त साखर कमी करण्यास मदत करतं. यामुळे शरीर हायड्रेट राहतं आणि तब्येत सुधारण्यास मदत होते.
आराम-आरामात हलकी शारीरिक हालचाल केल्याने शुगर नियंत्रणात ठेवता येते. चालणं किंवा साधा व्यायाम याचा फायदा होतो. मात्र तीव्र स्वरूपातील व्यायाम करणं टाळावं.
जर शुगर २४० पेक्षा जास्त असेल आणि उलटी, पोटदुखी, जास्त तहान किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. तसंच गोड पदार्थ ताबडतोब बंद करून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध आणि तपासणी करावी.