आजकाल मधुमेहाचं प्रमाण जगभरात वाढताना दिसतंय. जर याची लक्षणं वेळेत ओळखली तर डायबेटीजला नियंत्रणात ठेवणं सोपं होतं. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं, सतत तहान लागणं आणि वारंवार लघवी होणं ही याची सामान्यपणे लक्षणं दिसून येतात.
दरम्यान या आजारांची लक्षणं पायांमध्ये देखील दिसून येऊ शकतात. पाय आपल्या शरीराचा संपूर्ण भार उचलतात. टीओआयच्या अहवालानुसार, मधुमेहाची लक्षणं ही काही प्रमाणात पायांमध्ये दिसून येतात. ही लक्षणं नेमकी कोणती आहेत ते पाहूयात.
बऱ्याच लोकांना पायांमध्ये मुंग्या येण्याची समस्या सतावते. शिवाय पायांना सुईप्रमाणे टोचल्यासारखं वाटू लागतं. लोक सहसा एकाच स्थितीत बराच वेळ बसल्याने हा त्रास होोत म्हणतात. जर हा त्रास संवेदना वारंवार होत असेल किंवा बराच काळ राहत असेल तर ते मज्जातंतूंच्या नुकसानीचं लक्षण असू शकतं. याला पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणतात.
पायांवर अचानक केस कमी होणं हे देखील मधुमेहाचं एक लक्षण असू शकतं. लोक याला त्वचेची सामान्य समस्या मानतात. परंतु मधुमेहामध्ये रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे केसांच्या मुळांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण पोहोचत नाही. यामुळे पायांवरील केस हळूहळू कमी होऊ लागतात.
काही प्रकरणांमध्ये घोटा किंवा पोटरीच्या सभोवतालच्या त्वचेचा रंग देखील बदलतो. हा गडद किंवा गडद डाग म्हणून दिसू शकतात. बऱ्याच वेळा लोक त्यांना टॅन किंवा घाण समजण्याची चूक करतात. परंतु हे मधुमेहाचं लक्षण देखील असू शकतं. उच्च रक्तातील साखर लहान रक्तवाहिन्यांवर परिणाम करते, ज्यामुळे त्वचेत असे बदल होतात.
रात्री पायात अचानक क्रॅम्प येणं देखील मधुमेहाशी संबंधित असू शकतं. सहसा लोकांना ही पाण्याची कमतरता वाटू लागते. परंतु काही वेळा हे रक्त प्रवाहात अडथळा किंवा मज्जातंतूंच्या समस्येमुळे देखील असू शकतं. ज्यावेळी पुरेसं रक्त स्नायूंपर्यंत पोहोचत नाही तेव्हा क्रॅम्स सुरू होतात.
कधी कधी पायांच्या तापमानात बदल झाल्याचंही जाणवू लागतं. काही लोकांना पाय खूपच थंड जाणवतात. तर काहींना ते फार गरम वाटू लागतात. ही स्थिती रक्तवाहिन्यांवर परिणाम होण्याचं लक्षण असू शकतं. त्यामुळे असे बदल पायांमध्ये सतत होत राहतात. यामध्ये वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.