ears accumulate filth saam tv
लाईफस्टाईल

Earwax accumulation : कानात सतत घाण का जमा होते? कान साफ करण्याची घरगुती आणि सोप्या पद्धती

Easy earwax removal: कानामध्ये घाण जमा होण्याला सामान्यतः कानचा मळ (Earwax) किंवा सेरुमेन (Cerumen) असं म्हणतात, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यावर काय उपाय आहेत ते जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव फार महत्त्वाचा असतो. यामध्ये कानाचा देखील समावेश आहे. आपल्या शरीरातील कान हा एक असा अवयव आहे जो ऐकण्याचं काम करतो आणि स्वतःला साफ देखील ठेवतो. मात्र अनेकदा कानात अधिक मळ आणि ईअरवॅक्स जमा होऊ लागतो. ज्यामुळे कमी ऐकू येणं आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो.

कानामध्ये घाण जमा होण्याची अनेक कारणं आहेत, यामध्ये धूळ-माती किंवा ईअरफोनचा जास्त वापर इत्यादी. जर तुम्ही सतत कानातील घाण साफ करण्यासाठी मेहनत घेत असाल तर आम्ही तुम्हाला सोपे आणि अधिक प्रभावी मार्ग सांगणार आहोत. यामध्ये तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही.

कानातील घाण साफ करण्याचे सोपे उपाय

कानात कोमट तेल घाला

तुमच्या घरी असलेलं खोबरेल तेल थोडं गरम करा. यानंतर या कोमट तेलाचे २ ते ३ थेंब कानात टाका. यावेळी काही मिनिटं तुमचं डोकं एका बाजूला ठेवा. यामुळे एअरवॅक्स नरम होऊन सहजरित्या बाहेर पडतो.

हायड्रोजन पॅरॉक्साईचा वापर

अर्धा चमचा हायड्रोजन पॅरॉक्साईडला पाण्यात मिसळा. यानंतर हे मिश्रण कानात घालून डोकं दुसऱ्या दिशेला करा. जेणेकरून कानामध्ये असलेली घाण बाहेर येण्यास मदत होईल.

गरम पाणी

हलक्या गरम पाण्याने भरलेला एक ड्रॉपर कानात घाला. यानंतर डोकं झुकवून ठेवा. ही पद्धत कानातील घाण सैल करून बाहेर काढण्यास मदत करतं.

वाफ घ्या

गरम पाण्याने वाफ घेऊन देखील कानाच्या आतील घाण नरम होते. परिणामी ही घाण बाहेर पडण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT