Ear Infection
Ear Infection Saam Tv
लाईफस्टाईल

Turmeric For Ear Infection: कान दुखतोय ? इन्फेक्शन झालंय ? हळदीचा वापर करून असा दूर करा तुमचा त्रास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ear Problem : भारतीय जेवणात हळदीचा वापर वर्षानुवर्षे केला जात आहे. याच्या वापराने अनेक रोग सहज बरे होऊ शकतात. प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, कॅलरीज आणि फायबर हे निरोगी पदार्थांमध्ये आढळतात. यासोबतच हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे इन्फेक्शनमुळे होणाऱ्या समस्या कमी करण्यात मदत करतात.

हळदीमध्ये अनेक औषधी (Medicine) गुणधर्म असून कानाच्या संसर्गामध्ये देखील वापरले हळद वापरली जाऊ शकते. कान दुखत असेल किंवा इन्फेक्शन झाले असेल तर त्यासाठी हळदीचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.

हळद व नारळाचे तेल -

हळदीच्या (Turmeric) पावडरच्या वापराने कान दुखणे आणि इन्फेक्शनमध्ये (Infection) आराम मिळतो. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे कानाच्या नसांना आराम दण्यास मदत करतात. ते वापरण्यासाठी, न चमचे खोबरेल तेलात एक चमचा हळद पावडर मिसळा. त्यानंतर हे मिश्रण 4 ते 5 मिनिटे गॅसवर गरम करा. यानंतर ते गॅसवरून उतरवा आणि कोमट झाल्यावर कानात तेलाचे काही थेंब कापसाच्या साहाय्याने टाका. यानंतर कानाचे छिद्र कापसाने झाकून टाका.

हळदीचे पाणी -

या उपायासाठी एक कप पाणी घ्या. त्यात चिमूटभर हळद घालून उकळा. यानंतर हे पाणी गॅसवरून काढून थोडे कोमट होऊ द्या. कोमट पाण्याचे काही थेंब कानात टाका. यामुळे कानातल्या घाणीमुळे होणारा त्रास आणि संसर्ग कमी होतो. तसेच कानातील मळ मऊ होऊन सहज बाहेर येतो.

हळद आणि लसणाचे तेल -

हे तेल बनवण्यासाठी लसणाच्या 2 ते 3 कळ्या बारीक करा. यानंतर एका पॅनमध्ये सुमारे दोन चमचे खोबरेल तेल टाका. आता त्यात ठेचलेला लसूण आणि चिमूटभर हळद घालून गरम करा. हे तेल साधारण चार ते पाच मिनिटे उकळू द्या. यानंतर गॅसवरून काढून गाळून घ्या. कान दुखत असल्यास या तेलाचे काही थेंब टाका.

मात्र कानाच्या अनेक आजारांमध्ये घरगुती उपायांचा अवलंब करू नये. जर तुम्हाला सतत कानात वेदना होत असतील तर कोणत्याही प्रकारचे तेल वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तसेच, लहान मुलाला कान दुखत असल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT