आजपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण प्रत्येक शहरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, परंतु देशातील काही शहरांमध्ये दुर्गापूजेचे वेगळेच वैभव पाहायला मिळते. भारतातील या प्रसिद्ध ठिकाणांबद्दल जाणून घेऊया .
देशभरात दुर्गा पूजा मोठ्या थाटामाटात साजरी (Celebrating) केली जाते. या उत्सवात प्रत्येक ठिकाणचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. लोक या उत्सवाची जोरदार तयारी करतात. हा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो. यंदा हा उत्सव आजपासून सुरू झाली आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात नवरात्रीचा सण (Festival) मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. तरी देशातील काही शहरांमध्ये दुर्गापूजेचा नजारा अप्रतिम असतो. जर तुम्ही नवरात्रीच्या दरम्यान भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या शहरांमध्ये दुर्गापूजेचे खरे आकर्षण पाहायला मिळेल.
कोलकाता
दुर्गापूजा (Durga Puja) आणि कोलकाता शहराचा खूप खोल संबंध आहे. येथे दुर्गापूजा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. कोलकात्यात होणारी दुर्गा पूजा देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. दुर्गापूजा उत्सवादरम्यान तुम्हाला येथे अतिशय सुंदर मंडप पाहायला मिळतात. येथे दरवर्षी नवीन थीम घेऊन दुर्गापूजेचे आयोजन केले जाते. या सणादरम्यान महिला एकमेकांना सिंदूर लावतात, एक वेगळेच सौंदर्य येथे पाहायला मिळते. जर तुम्हाला बंगाली संस्कृती पाहायची असेल तर दुर्गापूजेच्या वेळी कोलकाताला नक्की भेट द्या. तुम्ही येथे बंगाली जेवणाचाही आनंद घेऊ शकता.
मुंबई
मुंबईतील इतर सणांप्रमाणे दुर्गापूजाही मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. येथे विविध राज्यातील लोक राहतात. या पूजा समारंभात बॉलिवूड सेलिब्रिटीही सहभागी होतात. तुम्हाला दुर्गापूजेचा भव्य सोहळा पाहायचा असेल, तर मुंबई तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. मुंबईत ठिकठिकाणी गरबा आयोजित केला जातो. त्यामुळे लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात.
बनारस
नवरात्रीच्या काळात बनारसचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. दुर्गापूजेच्या वेळी येथील वातावरण पूर्णपणे वेगळे असते. येथे तुम्हाला राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या अवतारातील लहान मुले बघायला मिळतील, जी अतिशय आकर्षक आहेत.
म्हैसूर
दुर्गापूजेसाठी जगभरातून लोक येतात. या विशेष प्रसंगी एक झांकी देखील काढली जाते. नवरात्रीच्या काळात म्हैसूर पॅलेसचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. यावेळी शहराला खूप सजवले जाते. चामुंडेश्वरी मंदिरात आपण देवीची भव्य पूजा पाहू शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.