Sleeping Problems, Insomnia Saam Tv
लाईफस्टाईल

Sleeping Problem : झोपेच्या कमतरतेमुळे जडू शकतात गंभीर आजार, शांत झोप लागण्यासाठी हे उपाय करुन पाहा

Insomnia : दिवसभर थकल्यानंतरही अनेकांना शांतपणे झोप लागत नाही. अनेक व्यक्तींना रात्री झोपताना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बदलेल्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्याशी संबंध असल्याचे समजले जाते.

कोमल दामुद्रे

Sleep Problems Treatment :

दिवसभर थकल्यानंतरही अनेकांना शांतपणे झोप लागत नाही. अनेक व्यक्तींना रात्री झोपताना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बदलेल्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्याशी संबंध असल्याचे समजले जाते.

झोपेच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक गंभीर आजार (Disease) जडण्याची समस्या आहे. चांगल्या झोपेसाठी आपण चांगला आहार योग्य असायला हवा. आपल्याला किमान ७ ते ८ तासांची झोप पूर्ण करणे गरजेचे आहे. जर दिवसभर थकूनही तुम्हाला झोप येत नसेल तर कोणते गंभीर आजार तुम्हाला होऊ शकतात जाणून घ्या.

1. लठ्ठपणा

कमी झोपेमुळे शरीरातील चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे वजन वाढते. वाढत्या वजनामुळे तुमचे शरीर अनेक गंभीर आजारांना बळी पडते.

2. मधुमेह

पुरेशी झोप न मिळाल्याने प्री-डायबेटिस (Diabetes) होण्याचा धोका अधिक असतो. झोपेच्या कमतरतेमुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता, तणाव (Stress), हार्मोन्स आणि जळजळ वाढते. ज्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते.

3. हार्ट अटॅक

संशोधनातून असे कळाले की, दररोज दोन तास कमी झोप घेतल्याने हृदयासंबंधित आजार होऊ शकतात. ज्यामुळे तुमचा बीपी वाढतो. हृदयावर दबाव येतो. अशा स्थितीत ऑक्सिजन पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या खराब होतात. ज्यामुळे हार्ट अटॅक येतो.

4. स्मरणशक्ती कमकुवत होणे

झोपेच्या कमतरतेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. कमी झोपेमुळे तणावाची पातळी वाढते. ज्यामुळे मेंदूला चालना मिळत नाही. यामुळे डिप्रेशन, नैराश्याचे आपण शिकार होतो.

5. चांगली झोप येण्यासाठी काय करावे?

  • स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहाराची योग्य काळजी घ्या. नेहमी फ्रेश अन्नपदार्थ खा.

  • चांगल्या झोपेसाठी बाहेरचे जंक फूड खाणे बंद करा. तळलेले पदार्थ खाणे शक्यतो कमी करा.

  • दिवसभरात ५ ते ६ लीटर पाणी प्या. यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल. तसेच शरीर हायड्रेट राहिल.

  • चांगल्या झोपेसाठी नियमित व्यायाम करा. कॅफीनचे सेवन कमी प्रमाणात करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: साताऱ्याचा ओमकार IAS झाला, ४ वेळा अपयश आलं पण हरला नाही, वाचा शेतकर्‍याच्या लेकाची यशोगाथा

French Toast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांत बनवा घरच्या घरी कुरकुरीत आणि सॉफ्ट फ्रेंच टोस्ट

Maharashtra Live News Update : काँग्रेसकडून भाजपच्या पराभूत उमेदवाराला स्वीकृत सदस्य म्हणून संधी

देशातील पेट्रोलचा साठा संपणार? युद्धाची झळ की अफवांचा वणवा? VIDEO

Maharashtra Government: मोठी बातमी! गावातच मिळणार नॉन-क्रीमिलेअर आणि जातीचा दाखला, १६ शासकीय सुविधाही मिळतील तुमच्याच गावात

SCROLL FOR NEXT