Dry Cough
Dry Cough Saam Tv
लाईफस्टाईल

Dry Cough : कोरड्या खोकल्यावर बेस्ट आहेत 'हे' 5 पदार्थ; मिनिटांत मिळेल आराम !

कोमल दामुद्रे

Dry Cough : हिवाळा सुरु झाला की, सगळ्यात आधी होणारे आजार हे सर्दी-खोकला. झोपण्यापासून ते सकाळी उठण्यापर्यंत आपला संपूर्ण दिवस यातच जातो. डोकेदुखी, खोकल्यामुळे सतत घसा दुखणे यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

खोकला झाल्यानंतर अनेकदा आपला कफ सुकतो किंवा आतल्या आत तो चिकटून राहतो. ऍलर्जी, दमा, संसर्ग किंवा ऍसिड रिफ्लक्स यासह अनेक कारणांमुळे खोकला होऊ शकतो. कोरड्या खोकला झाल्यानंतर जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा अधिक समस्या असते. खरं तर, यामुळे झोप येणे कठीण होते. यासाठी काही घरगुती टिप्स फॉलो केल्यातर आपल्याला फायदा होऊ शकतो.

1. आल्याचा चहा

Ginger Tea

कोरड्या खोकल्यावर आलं हे नेहमी उपयुक्त समजले जाते. ही एक औषधी वनस्पती असून या आजारावर रामबाण उपाय आहे. आल्यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, जे घशातील जळजळ आणि श्वसनमार्गाला पुन्हा आधीसारखे करण्यास मदत करतात, ज्यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो. आल्याचा चहा प्यायल्याने आपल्याला फायदा (Benefits) होऊ शकतो.

2. लसूण

Garlic

कोरड्या खोकल्यावर उपचार करण्यासाठी स्वयंपाकघरातील लसूण हा आणखी एक पर्याय आहे. लसणाची एक पाकळी चघळल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो. लसूण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करतो. ज्यामुळे आपण अनेक रोगांपासून दूर राहू शकतो.

3. मध व लिंबू पाणी

Honey and lemon water

कोरडा खोकला आणि घसा जळजळणे या उपचारांसाठी मधाचा वापर खूप फायदेशीर आहे. कोमट पाण्यात मध व लिंबू घालून प्यायल्याने घश्याला आराम मिळेल. मधामध्ये व्हिटॅमीन (Vitamins) ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते तर लिंबामध्ये व्हिटॅमीन सी अधिक प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती कायम ठेवण्यास फायदा होतो.

4. ज्येष्ठमध

Licorice

ज्येष्ठमध हे आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपैकी एक आहे जे खोकला, दमा आणि घसा खवखवण्यावर खूप प्रभावी ठरते. याच्या काही उभ्या काड्या पाण्यात उकळा आणि हळूहळू गरम करुन त्याला चहासारखे प्या.यामुळे घसा खवखवणे किंवा कोरडा खोकला बरा होण्यास मदत होते.

5. थाईम

Thyme

कोरड्या खोकल्याच्या उपचारासाठी आणखी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणजे थाईम. कोरड्या आणि उबळ खोकल्याच्या तसेच डांग्या खोकल्यावरील उपचारांसाठी युरोपमधील सर्वात सामान्यतः वापरल्या जाणार्‍या औषधी वनस्पतींपैकी एक आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

SCROLL FOR NEXT